AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran President Death : …म्हणून इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर इस्रायलवर वाढला संशय

Iran President Death : इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर क्रॅश होणं ही दुर्घटना आहे की, कास्थान हे अजून स्पष्ट झालेलं नाही. या दरम्यान इस्रायलच्या भूमिकेवरुन मोठा दावा केला जातोय. इस्रायलने अजून यावर कुठलीही टिप्पणी केलेली नाही.

Iran President Death : ...म्हणून इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर इस्रायलवर वाढला संशय
ebrahim raisi helicopter crash conspiracy
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 1:41 PM

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर रविवारी अजरबैजानमध्ये कोसळलं. रईसी यांच्यासोबत इराणचे परराष्ट्र मंत्री मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन सुद्धा या हेलिकॉप्टरमध्ये होते. या भीषण अपघातात हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या सगळ्यांचाच मृत्यू झालाय. हेलिकॉप्टरचा ढिगारा सापडला आहे. दुघर्टनास्थळी बचाव पथक पोहोचलं आहे. इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर क्रॅश होणं ही दुर्घटना आहे की, कास्थान हे अजून स्पष्ट झालेलं नाही. या दरम्यान इस्रायलच्या भूमिकेवरुन मोठा दावा केला जातोय.

या दुर्घटनेनंतर इस्रायली न्यूज एजन्सी कानने दावा केला होता की, कोणीही वाचण्याची शक्यता नाहीय. त्यानंतर इस्रायलवर संशय वाढला आहे. इराणी राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेबद्दल इराणमधून जे कुठले रिपोर्ट समोर येत आहेत, त्यावर इस्रायलच बारीक लक्ष आहे. इस्रायलने अजून यावर कुठलीही टिप्पणी केलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर क्रॅशच्या या दुर्घटनेशी आपला कुठलाही संबंध नसल्याच इस्रायलने स्पष्ट केलय. इराणमध्ये काही लोक दुर्घटनेला इस्रायलशी जोडत आहेत. इस्रायलचा यामध्ये हात असल्याचा पसरवत आहेत, असं इस्रायली अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

तेहरानपासून किती किलोमीटरवर घडला अपघात?

हेलिकॉप्टर क्रॅशची ही दुर्घटना खराब हवामानामुळे घडली असं इस्रायलने म्हटलं आहे. या घटनेशी आमचा काही संबंध नाही. इराणची राजधानी तेहरानपासून जवळपास 600 किलोमीटर अंतरावर उत्तर-पश्चिममध्ये अजरबैजानच्या सीमेजवळ जोल्फा शहरात ही घटना घडली. रईसी रविवारी अजरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेवसोबत एक धरणाच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते. तिथून परतताना ही दुर्घटना घडली.

.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं
.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं.
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ.
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली.
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान.
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक.
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत.
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप.
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य.