Iran Protest: सत्ता सोडा…खोमेनीविरोधात तरुणाईचा संताप, 50 शहरात भडका, सत्ता उलथवून टाकण्याच्या नाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांचा थरकाप
Protest Against Ayatollah Khomeini: इराणमधील खोमेनी कुटुंबाच्या गेल्या चार दशकातील सत्तेला हादरे बसत आहेत. गेल्या काही वर्षात या इस्लामिक देशात लोक स्वातंत्र्यासाठी आणि मानवी मुल्यासाठी सतत रस्त्यावर उतरले आहेत. विशेषतः महिलांच्या हक्कासाठी अनेकदा आंदोलनं झाली. आता खोमेनींविरोधात आंदोलनाचा भडका उडाला आहे.

Gen Z Protest In Iran: इराणमधील परिस्थिती सातत्याने हाताबाहेर जात आहे. आर्थिक परिस्थिती, महागाईचा भडका आणि मॉरल, सोशल पोलिसिंगचा अतिरेक यामुळे महिलांसह तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या चारहून अधिक दशकांपासून खोमेनी कुटुंबाची इराणवर सत्ता आहे. अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांना सत्तेवरून खाली खेचा अशी नारेबाजी आणि घोषणा होत असल्याने सरकार हादरले आहेत. खोमेनींच्या असंख्य चुका आणि अमेरिकेच्या डोळ्यात ते खुपत असल्याने कोणीतरी या आंदोलनाला फूस लावल्याचे समोर येत आहे. दरम्यान गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या या आंदोलनाची वर्षाच्या पहिल्या दिवशीच भडका उडाला. त्यात सहा जणांचा मृत्यू आणि शेकडो गंभीर जखमी झाले. देशातील जवळपास 50 शहरांमध्ये हिंसक आंदोलनाचे लोण पसरले आहे. यामध्ये राजधानी तेहरान, मशहद, कोम, इस्फहान आणि खुजेस्तान या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागात असंतोषाचा भडका उडला आहे.
खोमेनी मुर्दाबाद
गुरुवारी आणि कालही काही आंदोलनकर्ते मारल्या गेले. त्यांच्या दफनविधीवेळी जनसमूह आक्रमक झाला. संतप्त जमावाने खोमेनी मुर्दाबादची नारे दिले. तर पहलवी पुन्हा येतील. इराण सुधारणावादी होईल. आम्हाला धार्मिक जोखड नको अशी नारेबाजी केली. या नवीन घोषणांमुळे खोमेनींचे तख्त धोक्यात आल्याचे आल्याचे मानले जाते. इस्लामिक क्रांती करून खोमेनी कुटुंब सत्तेत आले. त्यानंतर धर्माच्या नावाखाली महिलांवर आणि पुरुषांवर अनेक बंधनं लादण्यात आली. त्यांची मोठी मजबूत पकड झाली. या दमनशाहीविरोधात महिलांनी सातत्याने आवाज उठवला. अनेक महिला यामध्ये मारल्या गेल्या. पण आंदोलनात कधीच खंड पडला नाही. आता महागाई, हुकूमशाही आणि दमन याविरोधात तरुणाई रस्त्यावर उतरली आहे.
मशहद शहर हे शिया धर्मगुरूंची नगरी मानल्या जाते. याच शहरात खोमेनी विरोधात नारेबाजी करण्यात आली. तर राजेशाही परत आणा, पहलवी यांना परत आणा अशा घोषणा देण्यात आल्या. खोमेनी समर्थकांनी हा सर्व अमेरिकेचा खटाटोप असल्याचा कांगावा सुरू केला आहे. पण देशातील आर्थिक परिस्थिती, महागाई, तेहरान पाणी समस्या, महिलांच्या अधिकारांबाबत हे समर्थक बोलायला तयार नाहीत. त्यावरून वाद पेटला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने या ताज्या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा सज्जड दम इराणला भरला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अमेरिकेने इराणवर पुन्हा हल्ला केल्यास नवल वाटण्याची गरज नाही.
