
जून महिन्यात इराण-इस्रायलमध्ये 12 दिवस युद्ध चाललं. या युद्धाला आता दोन महिने झाले आहेत. इराणला अणवस्त्र संपन्न होण्यापासून रोखण्यासाठी हे युद्धा झालं. इस्रायल आणि अमेरिकेने इराणधील अण्विक तळ नष्ट केले. अमेरिकेने आपलं सर्वात घातक B 2 बॉम्बर विमान वापरुन इराणचे अण्विक प्रकल्प नष्ट केले. इराणने सुद्धा प्रतिकार केला. इस्रायलवर मिसाइल हल्ले केले. यात इस्रायलमधील इमारतींच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. इस्रायलने इराणचे अनेक बडे लष्करी अधिकारी मारले. इराणच रणनितीक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. या युद्धानंतर इराणने अणवस्त्र विकासाबद्दल ठाम भूमिका दाखवली होती. पण इराणने आता अणू कार्यक्रमाबद्दल नरमाईची भूमिका घेण्याचे संकेत दिलेत. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सोमवारी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की, “अमेरिका आणि युरोपियन देशांनी अनुचित आर्थिक प्रतिबंध हटवले, तर इराण अणू कार्यक्रमाबद्दल काही गोष्टी मान्य करायला तयार आहे”
“2015 सालच्या अण्विक कार्यक्रम कराराच्यावेळी इराणने, युरेनियम संवर्धनाची सीमा ठरवणं आणि नव्या मशीन्सवर बंदी स्वेच्छेने असे काही निर्बंध मान्य केले होते” याची आठवण इस्माईल बघाई यांनी करुन दिली. त्यांनी स्पष्टपणे म्हटलय की, “निर्बंध हटवण्यात आले, तर आम्ही सुद्धा सहकार्य करु. कुठलीही सवलत मिळणार नसेल तर आमच्याकडून सुद्धा अपेक्षा करु नका”
इराणने काय म्हटलय?
बघाई यांनी सांगितलं की, “तीन युरोपियन देशांसोबत चर्चा सुरु आहे. तेहरान अजून एकाफेरीच्या बोलणीसाठी तयार आहे. अजून कुठला ठोस निर्णय झालेला नाही” बघाई यांनी आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा संस्थेच्या (IAEA) डेप्युटी संचालकांच्या दौऱ्याचा उल्लेख केला. “इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण आणि IAEA ने समन्वयाची नवीन पद्धत निश्चित करणं गरजेच बनलं आहे” असं बघाई म्हणाले. “इतिहासात पहिल्यांदा कुठल्या देशाच्या शांततापूर्ण अणूऊर्जा तळांवर हल्ला झालाय. याच कारणामुळे सुरक्षा आणि सेफ्टीची चर्चा करावी लागतेय” असं बघाई म्हणाले.
इस्रायलवर मिसाइल्सचा पाऊस
13 जून रोजी इस्रायलने इराणवर हल्ला केला. 12 दिवसाच्या या लढाईत इस्रायलने इराणचे अणू प्रकल्प आणि सैन्य तळांना लक्ष्य केलं. इराणने इस्रायलच्या नागरिवस्त्यांवर हल्ले केले. 22 जून रोजी अमेरिकेने सुद्धा या युद्धात उडी घेतली. नतांज, फोर्डो आणि इस्फहान या साइट्सवर हल्ला केला. आयआरजीसी एअरोस्पेस फोर्सने ऑपरेशन ट्रू प्रॉमिस-III चालवून इस्रायलवर मिसाइल्सचा पाऊस पाडला. इतकच नाही, अमेरिकेचा सर्वात मोठा सैन्य तळ कतरच्या अल-उदीद एअर बेसवर अटॅक केला.