
इराणच्या अणस्त्र कार्यक्रमाविरोधात अमेरिका आणि इस्रायलने कारवाई केली. त्यानंतर तेहरानच्या एका मोठ्या मौलवीने अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात फतवा जारी केला आहे. न्यूयॉर्क सनच्या रिपोर्टनुसार, शिया मौलवी नासेर मकारेम शिराजीने जगभरातील मुस्लिमांन एकजूट होण्याच आवाहन करत फतवा जारी केला आहे. “कुठल्याही व्यक्ती किंवा सरकारपासून जागतिक इस्लामिक समुदायाच्या नेतृत्वाला धोका निर्माण होईल. त्याला योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल. इराणच्या सुप्रीम लीडरला धमकावणाऱ्या किंवा त्यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना अल्लाहच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल. अशी कुठलीही कृती अल्लाहचा अनादर मानली जाईल. त्याकडे अल्लाह विरुद्ध युद्ध म्हणून पाहिलं जाईल” असं फतव्यामध्ये म्हटलं आहे.
“अलीकडच्या दिवसात आपण पाहिलय की, अमेरिकी राष्ट्रपती आणि इस्रायलच्या नेत्यांनी कशा पद्धतीने वारंवार इराणच्या सुप्रीम लीडरला धमकावलं. सुप्रीम लीडर अशा पद्धतीन धमकावलं जात असेल, तर इस्लामी समुदाय आणि त्यांच्या नेतृत्वाच काय कर्तव्य आहे?. अमेरिकी सरकार किंवा अन्य कोणी अशा पद्धतीचे कट रचत असेल, तर जगभरातील मुस्लिमांची जबाबदारी काय आहे?” असे प्रश्न या फतव्यामध्ये विचारण्यात आले आहेत.
‘ती अल्लाहची अवहेलना मानली जाईल’
“जो कोणी इराणच सुप्रीम लीडर किंवा धार्मिक नेत्याच्या हत्येचा कट रचेल, त्याला इस्लामिक कायद्यातंर्गत कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. जगभरातील मुस्लिमांनी अशा शत्रूला ओळखून पूर्ण ताकदीने बदला घेतला पाहिजे. अल्लाहने सुप्रीम लीडरवर कृपा कायम ठेवून त्यांना सुरक्षित ठेवावं” असं या फतव्यात लिहिलं आहे. ‘जो कोणी इस्लामिक नेतृत्व आणि एकजुटीला धोका बनेल, ती अल्लाहची अवहेलना मानली जाईल’ असं फतव्यात म्हटलं आहे.