गड्यांनो युद्ध थांबणार रे… अमेरिकेनंतर इराणकडून थेट भाष्य, काही तासात..

कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण आणि अमेरिका युद्ध थांबले पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. यादरम्यानच आता इराणकडून युद्ध संपण्याचे संकेत देण्यात आले. मात्र, पुन्हा एकदा त्यांनी अमेरिकेचा खोटेपणा जगापुढे आणलाय.

गड्यांनो युद्ध थांबणार रे... अमेरिकेनंतर इराणकडून थेट भाष्य, काही तासात..
Iranian Foreign Minister Abbas Araghchi
| Updated on: Apr 01, 2026 | 9:01 AM

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. युद्ध थांबले पाहिजे, अशी जगाची मागणी आहे. इस्त्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात प्रत्यक्षात युद्ध सुरू असले तरीही या युद्धाचा फटका जगाला बसत आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने जगाला सळो की पळो झाले. तेलाचा मोठा तुटवडा आहे. अमेरिकेला या युद्धाचा थेटपणे फटका बसत आहे. अमेरिकेत गॅसच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. यादरम्यानच इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांनी अत्यंत मोठे विधान केले. अराघची यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, अमेरिकेचे मेसेज त्यांना मिळत आहेत. पण याचा अर्थ असा मुळीच नाही तर तेहरान वॉशिंग्टनसोबत चर्चा करत आहे. अल जजीरासोबत बोलताना इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांनी अनेक विषयांवर थेटपणे भाष्य केले. यासोबतच अमेरिकेसोबत वाटाघाटी नक्की इराणला का नाही करायची हे देखील त्यांनी सांगितले.

अब्बास अराघची यांनी म्हटले की, मला स्टीव विटकॉफ यांचे मेसेज मिळत आहेत. पण त्याचा कुठेच असा अर्थ होत नाही की, आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करत आहोत. अराघची यांनी म्हटले की, अमेरिकेच्या 15 सूत्री प्रस्तावाला आम्ही कोणतेही उत्तर दिले नाही किंवा आम्ही कोणती शर्यत ठेवली नाही. अमेरिकेसोबतचे युद्ध संपवण्याकरिता आम्ही तयार आहोत.

पण काही दिवसांकरिता युद्धविराम नाही. अमेरिकेसोबत चर्चा करण्यासाठी आम्हाला काही आक्षेप आहेत. अराघची यांनी हे देखील पुनरुच्चारित केले की, कोणत्याही इराणी पक्षासोबत वाटाघाटी करत आहोत, या अमेरिकेच्या दाव्यावर काहीच सत्यता नाही. सर्व संदेश परराष्ट्र मंत्रालयामार्फत पाठवले आणि स्वीकारले जातात आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये संवाद होतो.

मुळात म्हणजे अमेरिकेसोबत वाटाघाटी करायला काहीच हरकत नाही पण त्यांच्यासोबतचा अनुभव नक्कीच चांगला नाहीये. काही वर्षापूर्वी अमेरिकेने एक करार केला होता, पण अचानकपणे त्यांनी या करारातून माघार घेतली. यामुळे इराण अमेरिकेवर विश्वासच ठेऊ शकत नाही, असेही यादरम्यान त्यांनी म्हटले. अनेक देश या युद्धात मध्यस्थी करण्याकरिता पुढे आली आहेत.

Follow Us