AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्या हातात तलवारी आणि तुमचा गळा असेल.. इराणमध्ये मोठा भडका, थेट राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रीच..

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध पुन्हा भडकले आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. त्यामध्येच आता इराणमधील लोकांमध्येही मोठा भडका उठताना दिसत आहे. अंतर्गत कलह बाहेर येत आहे. इराणमध्ये मोठे सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता आहे. लोकांमध्ये रोष वाढलाय.

आमच्या हातात तलवारी आणि तुमचा गळा असेल.. इराणमध्ये मोठा भडका, थेट राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रीच..
Iran
| Updated on: Jul 19, 2026 | 8:38 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात प्रचंड तणाव वाढला आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. या युद्धामुळे जगावर एक वेगळे संकट आहे. स्थिती अधिक गंभीर होत आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. इराणवर अमेरिकेकडून मोठे हल्ले केले जात आहेत. त्यामध्येच जॉर्डनमधील अमेरिकी लष्कर तळावर जो हल्ला इराणने केला, ज्यानंतर अमेरिकेचा भडका उडाला. यादरम्यानच आता इराणमध्ये मोठे संकट उभे आहे. इराणमधील लोकांचा संताप वाढला आहे. राष्ट्रापती मसूद पेझेश्कियान आणि अमेरिकेसोबतच्या वाटाघाटींमध्ये सहभागी असलेल्या वरिष्ठ नेत्यांवर सत्तापालटाचा कट रचल्याचे आरोप करण्यात आले आहेत. अमेरिकेसोबतच्या करारात त्यांच्यावर आरोप करत इस्लामी क्रांतीची मूलभूत तत्त्वे आणि सर्वोच्च नेतृत्वाचे निर्देश यांच्याशी तडजोड करण्यात आली, असा आरोप आहे.

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, सर्वाेच्च नेते अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारवेळी नाराजी बाहेर आली. मसूद पेझेश्कियान यांच्याविरोधात यादरम्यान जोरदार घोषणाबाजी झाली. समझोतावादी मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. हेच नाही तर परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यावर दगडफेक करण्यात आली. त्यांना देशद्रोही देखील म्हणण्यात आले. हेच नाही तर आमच्या हातात तलवारी असतील आणि तुमचे गळे आमच्या हातात असतील असेही थेट इराणी लोकांकडून समझोत करार करणाऱ्या नेत्यांना म्हणण्यात आले.

अमेरिकेसोबत अराघची यांनी युद्धविराम करारासाठी पुढाकार घेतला. ते युद्ध थांबण्याकरिता सतत अमेरिकेच्या संपर्कात होते. मात्र, आता इराणी लोक त्यांच्या विरोधातच भूमिका घेत आहेत. एकीकडे अमेरिकेसोबत मोठे युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे इराणमध्येही खदखद बघायला मिळतंय. अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्कार वेळी या नेत्यांना गद्दार देखील म्हणण्यात आले. यासोबतच मोजतबा खामेनेई अत्यंसंस्कार पोहोचले नसल्यानेही लोकांमध्ये संताप दिसत आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव आहे. अमेरिकेकडून मोठे हल्ले होत असताना इराण ताठ उभा आहे. मात्र, आता इराणमधील अंतर्गत कलह पुढे येत आहे. ज्यामुळे इराणमध्येही मोठे सत्तापरिवर्तन होण्याचे संकेत आहेत. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिकेने इराणवर पहिला हल्ला केला. ज्यात खामेनेई कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्य मारले गेले. अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई या हल्ल्यातून वाचला. त्यानंतर त्याने सर्वाेच्च नेतेपदाची धुरा आपल्याकडे घेतली.

Follow Us