Sheikh Hasina: बांगलादेशात मोठं काहीतरी घडणार? शेख हसीना यांचे चार निकटवर्तीय नेते भारत दौऱ्यावर

Bangladesh Sheikh Hasina: बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे समर्थक मोठं काही करण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान तारिक रहमान यांनी आगपाखड केली होती. तर आता हसीना यांचे चार निकटवर्तीय नेते भारत दौऱ्यावर येत असल्याची माहिती समोर येत आहे.

Sheikh Hasina: बांगलादेशात मोठं काहीतरी घडणार? शेख हसीना यांचे चार निकटवर्तीय नेते भारत दौऱ्यावर
बांगलादेशात मोठं काहीतरी घडणार? शेख हसीना यांचे चार निकटवर्तीय नेते भारतात
| Updated on: Nov 22, 2026 | 9:19 AM

Bangladesh Sheikh Hasina: बांगलादेशमध्ये पुन्हा वातावरण बदलत आहे. दोन वर्षांपूर्वी बाह्यशक्तीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आंदोलन करून शेख हसीना यांचे सरकार उलथवले होते. त्या भारतात आश्रयाला आल्या. दरम्यान आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. अवामी लिगच्या देशव्यापी आंदोलनाचा परिणाम दिसून आला. माजी काळजीवाहू पंतप्रधान डॉ. मुहम्मद युनूस यांच्या घराला आग लावल्याची घटना समोर आली. या घडामोडी समोर येत असतानाच आता हसीना यांचे चार निकटवर्तीय नेते भारत दौऱ्यावर येत असल्याची बातमी समोर येत आहे. यामुळे शेजारील देशात मोठं काही तरी घडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

शेख हसीना बांगलादेशात परतणार

Loading...

माजी पंतप्रधान शेख हसीना या बांगलादेशात परतणार असल्याची चर्चा आहे. डिसेंबर महिन्यात बांगलादेशात जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अवामी लीगचे चार वरिष्ठ नेते आज भारतात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेख हसीना यांच्या परतीसाठी भारत आणि बांग्लादेश सीमेवरील संभाव्य मार्गांची पाहणी करू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.

हे नेते भारत दौऱ्यावर

अवामी लीग पार्टीचे जहांगीर कबीर नानक, मुजफ्फल हुसैन चौधरी माया, पक्षाचे संयुक्त महासचिव एएफएम बहाउद्दीन नसीम आणि माजी खासदार अलाउद्दीन अहमद चौधरी नसिम हे चार निकटवर्तीय भारतीय दौऱ्यावर आहेत. रविवारी हे नेते कोलकत्त्यात दाखल होतील. त्यानंतर ते भारत -बांग्लादेश सीमेवरील पेट्रोपोल बॉर्डरकडे जातील. त्यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत हे नेते त्रिपुरातील अगरतळा सीमेलाही भेट देणार आहेत. यामुळे शेख हसीना या महिन्याच्या अखेरीस अथवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेशात दाखल होण्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात अद्याप याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बांगलादेशात तणाव वाढला

शेख हसीना यांनी देशात परतण्याची घोषणा केल्यानंतर बीएनपी, कट्टरपंथी, जिहादी विरुद्ध अवामी लीग समर्थकांमध्ये तणाव वाढला आहे. देशातील विविध भागात जाळपोळ आणि हिंसक घटना घडत आहेत. कालिया नगरपालिकेत झालेल्या हिंसाचारात 50 घरांचे नुकसान झाले आहे. बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी काही दिवसांपूर्वी संसदेत अवामी लीगला इशारा दिला होता. तर शेख हसीना यांच्या परतीसाठी आवश्यक दस्तऐवज देण्यास नकार दिला होता. हसीना यांना कायद्याचे पालन करावे लागेल, अशी भूमिका रहमान सरकारने घेतली आहे. 5 ऑगस्ट 2024 रोजी हसीना भारतात आल्या होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us