इस्राईलचा गाझावर घातक हल्ला, एअर स्ट्राईकमध्ये 13 मुलांसह 33 जणांचा मृत्यू

इस्राईलचे गाझावरील हल्ले सुरूच आहेत. रविवारी (16 मे 2021) इस्राईलने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये गाझा शहरात 33 पॅलेस्टाईनच्या नागरिकांचा मृत्यू झालाय.

इस्राईलचा गाझावर घातक हल्ला, एअर स्ट्राईकमध्ये 13 मुलांसह 33 जणांचा मृत्यू
Photo Credit : Reuters


जेरुसलेम : इस्राईलचे गाझावरील हल्ले सुरूच आहेत. रविवारी (16 मे 2021) इस्राईलने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये गाझा शहरात 33 पॅलेस्टाईनच्या नागरिकांचा मृत्यू झालाय. यात 13 लहान मुलांचा समावेश आहे. इस्राईलने गाझावर केलेल्या हल्ल्यांपैकी हा आतापर्यंतचा दुसरीकडे हमास या कट्टरपंथी संघटनेकडूनही इस्राईलवर सातत्याने रॉकेट हल्ले केले जात आहेत (Israel air strike on Gaza 33 people including 13 child dead).

इस्राईलच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत गाझा शहरातील 181 पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झालाय. यात 52 लहान मुलांचा समावेश आहे. दुसरीकडे हमासच्या हल्ल्यात इस्राईलमधील 10 जणांचा मृत्यू झालाय. यात 2 लहान मुलांचा समावेश आहे. एकूणच हल्ले आणि प्रतिहल्ले हो असल्याने सध्या तरी या युद्धाचा कोणताही शेवट दिसत नाहीये. मात्र, यात सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर काळजी व्यक्त केली जातेय. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने या परिस्थितीवर रविवारी (16 मे) बैठक बोलावलीय.

हमासच्या नेत्यांच्या घरावर एअर स्ट्राईक

इस्राईलने गाझा शहरातील हमासच्या मोठ्या नेत्याला लक्ष्य करत हा एअर स्ट्राईक केल्याचा दावा केलाय. आम्ही दक्षिण गाझा शहरातील अल सिनवर (Yehya Al-Sinwar) याच्या घरावर एअर स्ट्राईक करण्यात आलाय. सिनवरला 2011 मध्ये इस्राईलच्या तुरुंगातून सोडण्यात आलं होतं. तो आत्ता हमासची राजकीय आणि मिलिटरी विंगचं (political and military wings of Hamas in Gaza) नेतृत्व करतो, असा दावा इस्राईलने केलाय.

माध्यमांची इमारत उद्ध्वस्त, जगभरातून इस्राईलवर टीका

इस्राईलने गाझामधील अमेरिकेची असोसिएटेड प्रेस आणि अल जझिरा या वृत्तसंस्थांचं कार्यलय असलेली 12 मजली इमारत उद्ध्वस्त केल्यानंतर तणाव आणखी वाढलाय. या हल्ल्यानंतर जगभरातून इस्राईलवर टीका होत आहे. मात्र, इस्राईलने या हल्ल्याचं समर्थन केलंय. तसेच आपण या इमारतीतील नागरिकांना इमारत रिकामी करण्याच्या सूचना केल्याचा दावा केलाय.

पुरावे सादर करा, हल्ल्यानंतर असोसिएटेट प्रेसची मागणी

असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने या हल्ल्याचा निषेध केलाय. तसेच इस्राईलने तातडीने या इमारतीवर हल्ला करण्यामागील पुरावे समोर ठेवावेत असं म्हटलंय. आम्हाला या इमारतीत हमासचं कार्यालय असल्याची कोणतीही माहिती नाही. त्यामुळे इस्राईलने केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करावेत, असं मत एपीने व्यक्त केलं.

या इमारतीवरील हल्ल्यानंतर हमासने देखील इस्राईलला प्रत्युत्तर देत 120 रॉकेट हल्ले केले. यातील अनेक रॉकेट इस्राईलने हवेतच नष्ट केले. तसेच यातील काही गाझातच खाली पडले.

आतापर्यंत कुणाकडून किती हल्ले?

हमास आणि इस्राईलच्या या युद्धात आतापर्यंत अनेक रॉकेट हल्ले आणि एअर स्ट्राईक करण्यात आलेत. गाझातील हमास आणि इतर कट्टरपंथी संघटनांनी आतापर्यंत 2000 रॉकेट हल्ले केल्याचा दावा इस्राईलच्या सैन्याने केलाय. तर दुसरीकडे इस्राईलनेही 1000 एअर आणि आर्टिलरी स्ट्राईक केलेत. हे सर्व हल्ले मोठी लोकसंख्या असलेल्या गाझातील भागात करण्यात आलेत. इस्राईलने आपण हमास आणि इतर कट्टरवादी संघटनांना लक्ष्य करण्यासाठी हल्ले केल्याचा दावा केलाय.

“नागरिकांचे मृत्यू आणि माध्यमांच्या इमारतीवरील हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन”

संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनी गुटेरे यांनी सर्वांना आठवण करुन दिलीय की “सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करणं आणि माध्यमांच्या इमारतींना लक्ष्य करणं हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन आहे. हे कोणत्याही परिस्थितीत टाळलं पाहिजे.”

जोपर्यंत मोहिम पूर्ण होत नाही तोपर्यंत हल्ले सुरुच राहणार : नेत्यान्याहू

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी मात्र हे हल्ले सुरुच राहणार असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले, “आम्ही आमच्या मोहिमेच्या मध्यावर आहोत. ही मोहिम संपलेली नाही. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत ही मोहिम सुरुच राहिल.”

हेही वाचा :

इस्राईलने सीमेवर हजारो सैनिक पाठवले, गाजावर शेकडो हवाई हल्ले, हिंसा थांबणार की युद्ध पेटणार?

जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीत असं काय घडलं की इस्राईल-हमास रॉकेट हल्ले करायला लागले? वाचा संपूर्ण प्रकरण

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा संघर्ष, 100 रॉकेट डागली, 20 नागरिकांचा बळी

व्हिडीओ पाहा :

Israel air strike on Gaza 33 people including 13 child dead

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI