Israel Hamas War : जग हादरलं! इस्रायलचा गाझावर सर्वात मोठा हवाई हल्ला, तब्बल…

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा भडका उडाला आहे. नुकतेच इस्रायलने गाझा शहरावर मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात आता 32 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Israel Hamas War : जग हादरलं! इस्रायलचा गाझावर सर्वात मोठा हवाई हल्ला, तब्बल...
israel and hamas war
| Updated on: Sep 27, 2025 | 3:23 PM

Israel Hamas War : सध्या इस्रायल आणि हमास यांच्यात घणघोर युद्ध चालू आहे. इस्रायली लष्करकडून गाझावर मोठ्या प्रमाणात हल्ला केला जात आहे. फ्रान्स, ऑस्ट्रेलियासह इतरही काही देशांनी पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. यामुळेदेखील इस्रायलने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. काहीही झालं नाही तरी आम्ही माघार घेणार नाही, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी जाहीर केलेले आहे. असे असतानाच आता पुन्हा एकदा इस्रायलने गाझा शहरावर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात तब्बल 32 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध कुठपर्यंत चिघळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या हल्ल्यात 32 लोकांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलने गाझावर पुन्हा एकदा मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्याबाबत गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सविस्त माहिती दिली आहे. 26 सप्टेंबरच्या रात्री इस्रायलने रात्रभर गाझावर हवाई हल्ले केले. यात 32 लोकांचा मृत्यू झाला आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. तसेच मध्य आणि उत्तर गाझामध्ये हे हल्ले झाले आहेत. या भागातील एका शरणार्थी शिबिरात एकाच कुटुंबातील नऊ जाणांचा मृत्यू झाला आहे. अल अवादा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

अनेक राष्ट्राच्या प्रतिनिधींनी केला सभात्याग

संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत नेतान्याहू यांनी भाषण केले. या भाषणातदेखील त्यांनी पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून दर्जा देण्याला विरोध केला. तसेच गाझाविरोधातील युद्ध आम्ही चालूच ठेवणार आहोत, असे संकेत त्यांनी आपल्या या भाषणात दिले आहे. मात्र नेतान्याहू यांनी आपले भाषण चालू करण्याआधीच त्यांच्या भूमिकेचा निषेध म्हणून काही राष्ट्रांनी सभात्याग केला होता. या भाषणांतर आता इस्रायलने हे हल्ले केले आहेत.

अनेक देशांनी दिली पॅलेस्टाईनला मान्यता

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध संपावे यासाठी अनेक देशांनी पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता दिल आहे. यामुळे इस्रायलवर एका प्रकारे दबाव वाढलेला आहे. इस्रायलचा मात्र पॅलेस्टाईनला राष्ट्र संबोधन्यास विरोध आहे. पॅलेस्टाईनला मान्यता म्हणजे हमासला एका प्रकारे पुरस्कार दिल्यासारखेच आहे, असे इस्रायलचे मत आहे. इस्रायलच्या याच धोरणाचा विरोध करत अनेक राष्ट्रांनी अमेरिकेने इस्रायलवर दबाव टाका आणि हे युद्ध थांबवावे असे आवाहन केलेले आहे.

ट्रम्प आमि नेतान्याहू यांच्यात होणार बैठक

दरम्यान, काही राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला राष्ट्राचा दर्जा दिल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायचे प्रमुख बेंजामीन नेतान्याहू यांच्यात सोमवारी बैठक होणार आहे. या बैठकीत गंभीर विषयांवर चर्चा केली जाणार आहे. त्यामुळेच या बैठकीत काही तोडगा निघणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.