
इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. अशातच आता इस्रायली हवाई दलाने इराणवर मोठा हल्ला केला आहे. इस्रायलच्या सैनिकांनी इराणचे एक लष्करी तळ उध्वस्त केलं आहे. तसेत जमिनीवरून हवेत मारा करणारे मिसाईल चालवणाऱ्या सैनिकांचा खात्मा केला आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
इस्रायल संरक्षण दलाने एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात इराणवर कसा हल्ला केला हे दिसत आहे. या हल्ल्यात इराणचे बरेच सैनिक ठार झाले आहेत, तसेच या सैनिकांचे लाँचर नष्ट करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर इराणला मोठा धक्का बसला आहे.
इराणचे क्षेपणास्त्र लाँचर नष्ट
इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यात केवळ इराणी सैनिकांसह क्षेपणास्त्र लाँचर पूर्णपणे नष्ट झाले आहे. इस्रायल संरक्षण दलाने दावा केला आहे की, या हल्ल्यामुळे इराणच्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे.
⭕️WATCH: The IAF identified and eliminated surface-to-air missile launch troops seconds before they reached a launcher south of Tehran. The troops were eliminated and the launcher was dismantled.
The IAF continues to operate to achieve air superiority across Iran. pic.twitter.com/h9eIK8SWCO
— Israel Defense Forces (@IDF) June 16, 2025
इस्रायल-इराण युद्ध
इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगाती चिंता वाढली आहे. कारण या यु्द्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करत आहेत. इस्रायली हवाई दलाने इराणमधील महत्वाची लष्करी तळे सुरु करण्यासाठी ऑपरेशन सुरू केले आहे. इराणच्या आक्रमक कारवायांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केली जात आहे.
अनेक अधिकाऱ्यांचा मृत्यू
इस्रायलने याआधीही इराणवर अनेक हल्ले केले आहेत. इराणची सरकारी वृत्तसंस्था तस्नीम न्यूजने म्हटले की, इस्त्रायलच्या हल्ल्यात ब्रिगेडियर जनरल मोहम्मद काजेमी, उपप्रमुख हसन मोहाकिक इस्त्राइल आणि आणखी एक अधिकारी मोहसिन बाघेरी यांचाही मृत्यू झाला आहे. या हल्ल्याने इराणच्या लष्कराला मोठा झटका दिला आहे. या तीन अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे इराणच्या लष्करी रचनेला मोठा धक्का बसला आहे आणि देशाच्या गुप्तचर यंत्रणेवरही मोठा परिणाम झाला आहे.
अयातुल्ला अली खामेनी यांना बंकरमध्ये हलवले
इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्त्रायल हल्ल्याच्या भीतीमुळे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना तेहरानच्या ईशान्येकडील लाविझान येथील भूमिगत बंकरमध्ये हलवण्यात आले. खामेनी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब या बंकरमध्ये आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, एप्रिल 2024 आणि ऑक्टोंबरमध्ये इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांदरम्यान इतरही नेत्यांनी या बंकरमध्ये आश्रय घेतला होता.