AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas conflict | नवरा पुण्यात नोकरीला, शीजा इस्रायलमधून पतीसोबत बोलताना अचानक कॉल कट झाला, आणि….

Israel-Hamas conflict | नवऱ्यासोबत VIDEO कॉलवर असताना शीजासोबत काय घडलं?. हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले. त्यांनी महिला, मुलं, आजीबाई कोणाला सोडलं नाही. क्रूरतेच्या सर्व मर्यादा त्यांनी ओलांडल्या.

Israel-Hamas conflict | नवरा पुण्यात नोकरीला, शीजा इस्रायलमधून पतीसोबत बोलताना अचानक कॉल कट झाला, आणि....
Israel Hamas conflict Indian woman injured
| Updated on: Oct 09, 2023 | 2:05 PM
Share

जेरुसलेम : पॅलेस्टाइनमधील ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने शनिवारी इस्रायलवर मोठा हल्ला केला. जमीन, हवा आणि पाणी या तिन्ही मार्गांनी हा हल्ला झाला. यात शेकडो इस्रायली नागरिक मारले गेले. हजारो नागरिक जखमी झालेत. इस्रायलसोबत जगातील अन्य देशांच्या नागरिकांचा सुद्धा या हल्ल्यात मृत्यू झालाय. काही परदेशी नागरिक जखमी झालेत. यात एक भारतीय महिला सुद्धा आहे. ही महिला केरळमधील आहे. इस्रायलमध्ये ती नर्स म्हणून नोकरीला आहे. भारतात राहणाऱ्या नवऱ्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असताना, ती जखमी झाली. शीजा आनंद (41) या महिलेच नाव आहे. मागच्या सात वर्षांपासून ती इस्रायलमध्ये नोकरीसाठी आहे. हमासने अचानक हल्ला केला, तेव्हा तिने भारतात राहणाऱ्या आपल्या कुटुंबाला फोन केला. मी सुरक्षित आहे, हे सांगण्यासाठी तिने कॉल केला होता.

त्यानंतर तिने नवऱ्याला फोन केला. ती नवऱ्यासोबत बोलत असताना, अचानक हा कॉल कट झाला. तिच्यामागे मोठा आवाज ऐकू आला. शीजासोबत असणाऱ्या केरळमधील दुसऱ्या सहकाऱ्यांनी नंतर आनंद फॅमेलिला फोनकरुन कळवलं, की ती जखमी झालीय. तिच्यावर शस्त्रक्रिया सुरु आहे. शीजा आनंदला दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलय. शीजाचा नवरा आणि दोन मुलं भारतात राहतात. नवरा पुण्यामध्ये नोकरीला आहे. केरळमधील 200 पेक्षा अधिक जण बेथलहेम येथील हॉटेलमध्ये अडकले आहेत. ते सर्व सुरक्षित आहेत. या सगळ्यांना बेथलहेम येथील हॉटेलमध्ये थांबण्यास सांगण्यात आलय. सोमवारी म्हणजे आज हे सगळे इजिप्तला जाण्यासाठी निघतील.

पॅलेस्टाइनच्या एका हॉटेलमध्ये किती भारतीय अडकले?

कोचीमधील 45 जण पॅलेस्टाइनच्या एका हॉटेलमध्ये अडकले आहेत. हा ग्रुप सुरक्षित असून त्यांना सीमा ओलांडण्याची परवानगी मिळालीय. इस्रायलमधील भारतीय राजदूत आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना इस्रायलमधल्या परिस्थितीबद्दल कळवण्यात आलं आहे. शनिवारी इस्रायलवर समुद्र, हवाई आणि जमिनीमार्गाने गाझा पट्टीतून हल्ला झाला. गाझा पट्टीवर हमासची सत्ता आहे. हमासने इस्रायलवर जवळपास 5 हजार रॉकेट्स डागले. इस्रायलने हमास विरोधात युद्धाची घोषणा केलीय. तीन दिवसाच्या या युद्धात आतापर्यंत दोन्हीबाजूला 1,100 जणांचा मृत्यू झालाय. इस्रायलमध्ये 700 पेक्षा जास्त नागरिक मारले गेलेत. यात 44 सैनिक आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.