AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War | इस्रायलला फुल सपोर्ट, अमेरिकेपाठोपाठ आणखी एका देशाची रॉयल नेवी रणांगणात

Israel-Hamas War | हमासला पाठिंबा देणाऱ्या देशांची जरा विचार करावा, त्यांचं काय होईल?. इस्रायलसाठी दुसऱ्या देशांकडून युद्ध मदत येण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेने आपल्या फायटर विमानांच्या स्क्वाड्रन्स वाढवल्या आहेत.

Israel-Hamas War | इस्रायलला फुल सपोर्ट, अमेरिकेपाठोपाठ आणखी एका देशाची रॉयल नेवी रणांगणात
Israel-Hamas War
| Updated on: Oct 13, 2023 | 1:11 PM
Share

जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमधील युद्ध वाढत चाललय. दोन्ही बाजूला आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झालाय. इस्रायलला एकाचवेळी अनेक आघाड्यांवर युद्ध लढाव लागू शकतं. इराण, लेबनॉन हे सुद्धा इस्रायलला आणखी अडचणीत आणण्याच काम करतायत. इस्रायलच्या आसपास असलेले देश त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत. इस्रायलची ही परिस्थिती लक्षात घेऊन अमेरिकेने आपलं शक्तीशाली युद्ध जहाज आणि फायटर विमानांची स्क्वाड्रन्स पाठवली आहेत. जेणेकरुन अन्य कुठल्या देशाने या युद्धात पडण्याची हिम्मत करु नये. आता इस्रायलच्या मदतीसाठी आणखी एक देश पुढे आलाय. त्या देशाने सुद्धा इस्रायलसाठी आपली युद्ध जहाज पाठवण्याचा निर्णय घेतलाय. इस्रायलच्या समर्थनात ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मोठी घोषणा केलीय. भूमध्य सागरात इस्रायलला सपोर्ट करण्यासाठी टेहळणी विमान आणि रॉयल नेवीची दोन जहाज पाठवण्याचा निर्णय घेतलाय.

आजपासून ब्रिटनची टेहळणी विमानं दहशतवादी गटांच्या हातात कुठल्या मार्गाने शस्त्र पडतात, त्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात करेल. ब्रिटनकडून इस्रायलसाठी सहाय्यता पॅकेजमध्ये हेलिकॉप्टर, पी 8 विमान आणि नौदलाची एक कंपनी आहे. इस्रायलच आपण समर्थन करतो, असं पीएल सुनक म्हणाले. म्हणून भूमध्य सागरात ब्रिटनच्या युद्धनौका तैनात करण्यात येत आहेत. हमासच्या हल्ल्यानंतर ब्रिटीश पंतप्रधान सुनक यांची ही घोषणा इस्रायलसाठी खूप महत्त्वाची आहे. ब्रिटनने त्याशिवाय आणखी सहाय्यता पॅकेजची घोषणा केलीय. ब्रिटनच्या सैन्य पाठबळामुळे हमास पुढे येण्यास धजावणार नाही, असं ऋषि सुनक म्हणाले. 150 जणांना बंधक बनवलय

इस्रायलमधून जी भयाकन दृश्य समोर आली आहेत, तसं पुन्हा घडू नय़े यासाठी काम करायची आवश्यकता आहे असं सुनक म्हणाले. हमासने शनिवारी दक्षिण इस्रायलच्या नागरी वस्त्यांमध्ये घुसून हैदोस घातला. त्यांच्या हल्ल्यात 1200 पेक्षा जास्त इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. जवळपास 150 जणांना बंधक बनवण्यात आलय. इस्रायलने प्रत्युत्तराची कारवाई केली. त्यात गाजामध्ये 1300 पेक्षा अधिक लोक मारले गेले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?