AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War | हमासचे दहशतवादी आता कुठे पळणार? इस्रायलने बाहेर काढलं ‘आर्यन स्टिंग’

Israel-Hamas War | इस्रायली सैन्याने बाहेर काढलेल हे नवीन अस्त्र 'आर्यन स्टिंग' काय आहे?. या आर्यन स्टिंगमुळे काय होईल?. हमास विरोधी युद्धात आर्यन स्टिंग गेम चेंजर अस्त्र असल्याच इस्रायली सैन्याने म्हटलं आहे.

Israel-Hamas War | हमासचे दहशतवादी आता कुठे पळणार? इस्रायलने बाहेर काढलं 'आर्यन स्टिंग'
israel-hamas warImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 25, 2023 | 3:32 PM
Share

जेरुसलेम : सध्या गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु आहे. इस्रायली सैन्य अजून गाझा पट्टीत पूर्णपणे घुसलेलं नाहीय. पण काही प्रमाणात गाझा पट्टीत छापेमारीची कारवाई सुरु आहे. गाझा पट्टी हा घनदाट लोकवस्तीचा प्रदेश आहे. तिथे आमने-सामनेच्या लढाईत इस्रायली सैन्याचही मोठ नुकसान होऊ शकतं. आता प्रत्यक्ष जमिनीवरच्या लढाईत हमासला धडा शिकवण्यासाठी इस्रायली सैन्याने आर्यन स्टिंग बाहेर काढलय. या आर्यन स्टिंगपासून हमासचे दहशतवादी वाचण्याची शक्यता फार कमी आहे. इस्रायलच हे नवीन अस्त्र असून आर्यन स्टिंग गेम चेंजर ठरेल. त्याचे काय फायदे आहेत? हे शस्त्र काय आहे? ते समजून घेऊया. 22 ऑक्टोबर 2023 ला इस्रायली सैन्याने सर्वप्रथम आर्यन स्टिंगचा वापर केला. हमासच्या तळांवर आर्यन स्टिंग डागण्यात आलं. आर्यन स्टिंग ही 120 MM गाईडेड मोर्टार आहे. इस्रायलच्या एलबिट सिस्टिमने हे गाईडेड मोर्टार बनवलेत.

आर्यन स्टिंगने अत्यंत अचूकतेने आपलं उद्दिष्ट्य साध्य केलं. या 120 MM गाईडेड मोर्टारची कामगिरी उत्तम आहे. जमिनी युद्धामध्ये हे अस्त्र क्रांतिकारी ठरेल. यामुळे अत्यंत अचूक आणि परिणामकारक फायरपावर इस्रायली सैन्याला मिळणार आहे. हमास विरोधी युद्धात आर्यन स्टिंग गेम चेंजर अस्त्र असल्याच इस्रायली सैन्याने म्हटलं आहे. शत्रूची रॉकेट्स आणि बोगद्याची जी क्षमता आहे, त्यावर आर्यन स्टिंगमुळे बऱ्याच प्रमाणात वरचढ होता येईल, असं इस्रायलने म्हटलय. पारंपारिक मोर्टार जे आहेत, त्यात काही चुका होऊ शकतात. नागरिकांची जिवीतहानी होऊ शकते, मालमत्तेच नुकसान होऊ शकतं. आर्यन स्टिंग मोर्टारच्या गायडेड क्षमतेमुळे अत्यंत अचूकतेने, ठरलेल्या टार्गेटवर प्रहार करता येऊ शकतो. गाझाच्या गजबजलेल्या वस्तीमध्ये हे मोर्टार निर्णायक ठरतली. ज्यामुळे मानवी नुकसान कमी होईल. आर्यन स्टिंग महाग असलं, तरी बराच खर्च वाचणार

हमासचे दहशतवादी नागरी वस्त्यांमधून ऑपरेट करतात. तिथल्या नागरिकांचा ढालीसारखा वापर करतात. आर्यन स्टिंगमुळे जिवीतहानी कमी करता येईल. पारंपारिक मोर्टारपेक्षा गाईडेड मोर्टार महागड्या आहेत. दीर्घकाळाच्या दृष्टीने विचार केल्यास याच्या वापरामुळे खर्च कमी होईल. कारण, कमी राऊंडस फायर करुन अपेक्षित रिझल्ट मिळेल. दारुगोळ्य़ावरचा खर्चही कमी होईल.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा