AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War | इस्रायल आता जमिनीवरुन हमासवर तुटून पडणार, घातक टॅंकसह या हत्यारांचा वापर करणार

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनूसार इस्रायलच्या पायदळ सैनिकांनी हमासवर हल्ला करण्यासाठी आगेकूच केली आहे.

Israel-Hamas War | इस्रायल आता जमिनीवरुन हमासवर तुटून पडणार, घातक टॅंकसह या हत्यारांचा वापर करणार
TANK Image Credit source: socialmedia
| Updated on: Oct 14, 2023 | 7:13 PM
Share

नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : इस्रायलवर हमासने हल्ला केल्यानंतर चवताळलेल्या इस्रायलने आता गाझा पट्टीवर जमिनी युद्धासाठी मोठी तयारी सुरु केली आहे. इस्रायली एअर फोर्स हमासच्या केंद्रांना लक्ष्य करुन निकामी करीत आहे. इस्रायलने तीन लाखाची रिझर्व्ह फोर्स तयार केली आहे. इस्रायलने गाझा सीमेजवळ आपले सैनिक, रणगाडे आणि युद्धसामुग्री तैनात केली आहे. गाझातून येणाऱ्या फोटोमध्ये रणगाडे तोफांचा मारा करताना दिसत आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनूसार इस्रायलच्या पायदळ सैनिकांनी हमासवर हल्ला करण्यासाठी आगेकूच केली आहे. इस्रायलने आधी उत्तर गाझामध्ये राहणाऱ्यांना सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत दक्षिण गाझाकडे जाण्याचा इशारा दिला होता. इस्रायली सैन्याने उत्तर गाझाच्या लोकांना सांगितले होते की जर तुम्ही स्वत:चा आणि कुटुंबांची काळजी करीत असाल तर दक्षिण गाजाच्या दिशे चालते व्हावे, हमासचे नेते केवळ स्वत:ची काळजी घेत असून हल्ल्याच्या भीतीने लपले आहेत.

धोकादायक पाऊल

न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीप्रमाणे संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी इस्रायलने गाझापट्टीच्या लोकांना दिलेल्या या धमकीला पुनर्विचार करण्याचा सल्ला देत हे पाऊल खूपच धोकादायक आणि चिंतेत टाकणारे असल्याचे म्हटले होते. हमासचे अतिरेकी गाझात नागरिकांना बंदी बनवित असल्याचे इस्रायल सुरक्षा दलाचे म्हणणे आहे.

आधी बेपत्ता नागरिकांचा शोध

इस्रायल डीफेन्स फोर्सने शनिवारी ( 14 ऑक्टोबर ) दिलेल्या माहितीनूसार इस्रायलवर हमासने केलेल्या अतिरेकी हल्ल्यात 1,300 जणांचा जीव गेला आणि 3000 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हमासचे अतिरेकी गाझा शहराच्या भुयारांमध्ये लपून बसले आहेत. इस्रायलच्या बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी इस्रायलचे पायदळ गाझा पट्टीत शिरले असून आधी इस्रायलच्या नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात येणार असल्याचे इस्रायल डीफेन्स फोर्सने म्हटले आहे.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.