AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel War : इराणच्या फक्त एका धमकीचा अमेरिकेवर इतका परिणाम, सॅटलाइट फोटोंमधून मोठा खुलासा

Iran Israel War : अमेरिका आणि इराणच्या सैन्य शक्तीची तुलना होऊ शकत नाही. पण युद्ध लढण्यासाठी शस्त्रांपेक्षा ती चालवण्याची हिम्मत लागते. इराणने अमेरिकेला सध्या फक्त धमकी दिली आहे. मध्ये पडू नका, तुमच्यावर सुद्धा हल्ले करु असा इशारा दिलाय. त्याचा अमेरिकेवर परिणाम दिसू लागलय. एका सॅटलाइट फोटोमधून मोठा खुलासा झाला आहे.

Iran Israel War : इराणच्या फक्त एका धमकीचा अमेरिकेवर इतका परिणाम, सॅटलाइट फोटोंमधून मोठा खुलासा
Israel-Iran War
| Updated on: Jun 20, 2025 | 11:16 AM
Share

मध्य पूर्वेत इस्रायल-इराणमध्ये घनघोर लढाई सुरु आहे. दररोज दोन्ही बाजूंकडून मिसाइलचा पाऊल पडतोय. तेल अवीव, हायफा या इस्रायली शहरांमध्ये इमारतींच मोठ नुकसान झालं आहे. दुसऱ्याबाजूला इराणचे अणवस्त्र प्रकल्प, सैन्य तळ, बॅलेस्टिक मिसाइल कारखाने यावर हल्ले सुरु आहेत. मात्र, त्यानंतरही इराणकडून इस्रायलवरील मिसाइल हल्ले कमी झालेले नाहीत. उलट इराणने आता हायपरसोनिक मिसाइलचा वापर सुरु केलाय. इस्रायली एअर डिफेन्स सिस्टिम हे मिसाइल हल्ले रोखण्यात कमी पडत आहे. दुसऱ्याबाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांना, इस्रायल-इराण युद्धात उतरायचं की नाही? हेच अजून ठरवता येत नाहीय. अमेरिका अजूनही गोंधळलेल्या मानसिकतेत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सध्या फक्त धमक्या दिल्या जात आहेत.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी तेहरान रिकामी करण्याची सोशल मीडियावरुन धमकी दिली होती. त्यावेळी अनेकांना वाटलं की, अमेरिका एक-दोन दिवसात इराणच्या अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ला करेल. आता बातमी अशी आहे की, युद्धात उतरायचं की नाही? हे अमेरिका दोन आठवड्यानंतर ठरवणार आहे. या सगळ्यामध्ये अमेरिकेची भूमिका महत्त्वाची आहे. पण कचखाऊ धोरणामुळे उलट आता अमेरिकेवर दबाव येऊ लागला आहे. रशिया-चीने हे देश इराणच जाहीर समर्थन करतायत.

अमेरिकेला भिती काय?

इराणकडून सुद्धा अमेरिकेला धमकावण्यात आलय. युद्धात उतरु नका अशी इराणने अमेरिकेला धमकी दिली आहे. तुम्ही मध्ये आलात, तर तुमच्यावरही हल्ले करु असं इराणने धमकावलय. इराणची क्षेपणास्त्र अमेरिकेपर्यंत पोहोचणार नसली, तरी मध्य पूर्वेत अमेरिकेचे जे सैन्य तळ आहेत, तिथे इराण मिसाइल हल्ला करेल अशी अमेरिकेला भिती आहे.

इराणच्या धमकीचा काय परिणाम दिसला?

इराणच्या या धमकीनंतर अमेरिकेवर त्याचे परिणाम सुद्धा दिसू लागले आहेत. मध्य पूर्वेत कतरमध्ये अमेरिकेचा अल उदीद एअर बेस आहे. या एअर बेसवर अमेरिकेची फायटर विमान दिसत नाहीयत. इथे इराणकडून एअर स्ट्राइक होण्याची भिती असल्याने अमेरिकेने या बेसवरुन त्यांची विमान हलवल्याची शक्यता आहे. एएफपीने हे वृत्त दिलं आहे.

सॅटलाइट फोटोंमधून खुलासा

सॅटलाइट फोटोंमधून हा खुलासा झाला आहे. 5 जून रोजी प्लॅनेट लॅब पीबीसीच्या फोटोमध्ये अल उदीद एअर बेसवर अमेरिकेची 40 फायटर विमान दिसत होती. यात हरक्युलस C-130 हे ट्रान्सपोर्ट विमान सुद्धा होतं. पण 19 जूनच्या फोटोमध्ये या एअरबेसवर फक्त तीन अमेरिकी विमान दिसतायत.

आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?.
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा.
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध.
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!.
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ...
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ....
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला.
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध.
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.