AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण-इस्त्रायल युद्ध लवकरच थांबणार? अमेरिका सोडा आता हा शक्तिशाली देश मैदानात, मोठी अपडेट काय?

Iran-Israel War : इस्त्रायल आणि इराण युद्धात अमेरिकेची भूमिका संशयास्पद आहे. इराणला जेरीस आणण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेल्याने अमेरिका हे युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करेल ही आशा राजकीय तज्ज्ञांना खोटी वाटते. त्यामुळे हा आता हा देश मध्यस्थीचा खटाटोप करत आहे.

इराण-इस्त्रायल युद्ध लवकरच थांबणार? अमेरिका सोडा आता हा शक्तिशाली देश मैदानात, मोठी अपडेट काय?
इस्त्रायल इराण युद्धImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 14, 2025 | 9:49 AM
Share

इराण आणि इस्त्रायल युद्धाने मध्य-पूर्व पुन्हा अशांत झाले आहे. तर इंधनासह सोने-चांदी आणि इतर वस्तूंच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हे युद्ध थांबावे यासाठी अमेरिकेचे जोरकस प्रयत्न होताना दिसत नाहीत. इराणला यापूर्वी अमेरिकेने पण जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. आता चीन या दोन्ही देशांना शांत करण्यासाठी, मध्यस्थीसाठी प्रयत्न करत आहे. चीनने सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. तर या संघर्षाचा कोणताही फायदा होणार नाही असा संदेश चीनने दिला आहे. चीनचे वन बेल्ट रूटसाठी सध्याची भूराजकीय परिस्थिती मोठे अडथळे ठरत आहे. त्यामुळे चीन अनेक ठिकाणी मध्यस्थीसाठी आग्रही असल्याचे समोर येत आहे.

चीनची भूमिका काय?

अलजजीरा या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, इस्त्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर चीनने इस्त्रायलवर टीका केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने याविषयी एक वक्तव्य दिले आहे. त्यानुसार, कोणत्याही देशाचे सार्वभौमत्व आणि त्याच्या अस्मितेचे उल्लंघन करणे योग्य नाही. म्हणजे इस्त्रायलने इराणवर केलेला हल्ला चीनला अमान्य आहे. इस्त्रायलच्या या कृत्याचा एकप्रकारे चीनने निषेध केला आहे. चीनने दोन्ही पक्षांमधील तणाव निवळावा यासाठी अप्रत्यक्षरित्या मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे.

मध्यस्थी करणार चीन?

दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी चीनने मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे. बीजिंगने स्थिती निवळण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली आहे. यापूर्वी चीनने इराण आणि सौदी अरबमधील तणाव कमी करत, दोघांमध्ये समेट घडवून आणली होती. 2023 मध्ये चीनने निर्णायक भूमिका घेतली होती. त्यामुळे आता मध्य-पूर्व देशात स्वतःचा दबदबा वाढवण्याची आयती संधी चीनला मिळाली आहे. इराणने जर मध्यस्थीचा प्रस्ताव ठेवला. तर अमेरिकेला शह देण्यासाठी चीनचे पाऊल पडू शकते. चीन इस्त्रायलला समेट घडवण्यासाठी मन वळवू शकतो, असा दावा करण्यात येत आहे.

इराणच्या जवळ, इस्त्रायलशी फटकून

चीनची या भागातील रणनीती लपलेली नाही. चीन पूर्वीपासूनच इराणची कड ओढत आलेला आहे. इस्त्रायलशी चीन फटकून वागत आहे. त्याच्या मागे अमेरिकेला शह देण्याची रणनीती आहे. बीजिंग आणि इराणमध्ये 2016 मध्ये राजकीय, व्यापारी करार झालेले आहेत. त्यामुळे इराणचे हितरक्षण करण्यासाठी चीन या भागात शांततेचा प्रस्ताव घेऊन आला आहे. गाझा पट्ट्यातील इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर चीन आणि या देशातील संवाद कमी झालेला आहे. चीन सातत्याने इस्त्रायलच्या धोरणावर टीका करत आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.