AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावकरी होणार पुढारी! प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुकीचा मुहूर्त ठरला, दिवाळीनंतर उडणार राजकीय धुराळा

Local Body Election in Maharashatra : नगरविकास विभागाने गुरुवारी महापालिका, नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले आहे.

गावकरी होणार पुढारी! प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुकीचा मुहूर्त ठरला, दिवाळीनंतर उडणार राजकीय धुराळा
महापालिका, पालिका निवडणुकीचे पडघमImage Credit source: गुगल
Updated on: Jun 14, 2025 | 8:38 AM
Share

अखेर बहुप्रतिक्षीत महापालिका, नगरपालिका निवडणुकीची तुतारी एकदाची फुंकली गेली. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या हालचालींना सुरुवात झाली. नगरविकास विभागाने गुरुवारी महापालिका, नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे निवडणुका दिवाळीनंतर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शासकीय स्तरावरील या घडामोडींमुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले आहे.

प्रभाग रचना सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच प्रभाग रचना पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे. वेळापत्रकानुसार, ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार आहे. २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान मुंबई महापालिका, राज्यातील अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येईल. राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम नगरविकास विभागाने गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रभाग रचना पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. ती नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पुढे जाऊ शकते, असे समोर येत आहे. प्राप्त वेळापत्रकानुसार ९ टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना ही २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाईल. तर ड दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाणार आहे. नगर परिषदा आणि नगरपंचायतींची अंतिम प्रभाग रचना ही राज्य निवडणूक आयुक्त २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान जाहीर करतील. यानंतर निवडणूक कार्यक्रम हाती घेण्यात येईल. त्यासाठी काही कालावधी जाईल आणि नंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन निवडणुका होतील.

अंतिम प्रभाग रचनेचे टप्पे समजून घ्या

अंतिम प्रभाग रचना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल

त्यानंतर प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात येईल

प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील

ही प्रक्रिया साधारणतः दीड महिन्यात पूर्ण होईल

ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पू्र्ण होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल

महापालिका-नगरपालिका निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता

मनसे कार्यकर्त्यांची धरपकड; शिंदेंचे मंत्री संतापले, भाजपला घरचा आहेर
मनसे कार्यकर्त्यांची धरपकड; शिंदेंचे मंत्री संतापले, भाजपला घरचा आहेर.
मीरा भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांची धरपकड
मीरा भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांची धरपकड.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना खुशखबर!
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना खुशखबर!.
शेखच्या कानाखाली बारा.. ; नितेश राणेंचा खोचक निशाणा
शेखच्या कानाखाली बारा.. ; नितेश राणेंचा खोचक निशाणा.
मोर्चा होणारच, तुम्ही.. ; पोलिसांच्या कारवाईनंतर संदीप देशपांडे भडकले
मोर्चा होणारच, तुम्ही.. ; पोलिसांच्या कारवाईनंतर संदीप देशपांडे भडकले.
अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात, मनसैनिक आक्रमक
अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात, मनसैनिक आक्रमक.
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा.
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?.
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी.
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन.