Plane Crash : 11A सीटला विमान प्रवाशांची का नकारघंटा? एअर इंडिया विमान अपघातात त्याच सीटवरील विश्वास रमेश यांचा तर जीव वाचला
Air India Plane Crash : अहमदाबादा येथील विमान अपघातात 11 ए सीट वरील प्रवाशी विश्वास रमेश हे सुदैवाने बचावले. ते ब्रिटिश नागरिक आहेत. ते त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी भाऊ अजय कुमार रमेश याच्यासोबत भारतात आले होते.

Flight AI171 Crash : विश्वास कुमार रमेश हे नाव गुरूवारी दुपारपासूनच चर्चेत आहे. कारण अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात तेच एकमेव जीवित प्रवाशी आहेत. ते या विमानात आसन क्रमांक 11A वर होते. साधारणपणे प्रवाशी या सीटसाठी नकारघंटा वाजवतात. हे सीट त्यांना नको असते. एअर इंडियाच्या विमान अपघातात 250 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या तपास सुरू आहे. तर विमान अपघातामागील कारणांचा शोध घेण्यात येत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. तर त्यांनी रुग्णालयात जात जखमींची चौकशी केली.
11A सीटला का नकार देतात?
रमेश यांचा आसन क्रमांक हा 11A हा होता. फ्लाईट अटेन्डेंट्सने द सन या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशी 11A आणि 11F हे आसन घेण्यास कचरतात. त्यांना हे आसन नको असतो. कारण ते विमानाच्या अगदी मध्यभागी आहेत. प्रवाशांना हे सीट मिळाल्यावर उतरताना त्यांचा क्रमांत शेवटी येतो. त्यामुळे अनेकांना हे सीट नको असते. जर तुम्हाला घाई असेल, गडबड असेल, अथवा विमानातून उतरल्यावर दुसरे विमान पकडायचे असेल तर 11A हे सीट तुम्हाला उशीर करू शकते, त्यामुळे प्रवाशी ते टाळतात असे अटेन्डेंट्सने सांगितले. तर फ्लाईट रडार 24 नुसार, बोईंगच्या एसी सिस्टिममुळे अनेकदा 11A या सीटवर खिडकी नसते. अथवा असली तरी ती अत्यंत छोटी असते. त्यामुळे तिथून जमिनीवरील दृश्य दिसत नाहीत.
कसे वाचले रमेश?
Boeing 787 Dreamliner AI171 च्या 11A या सीटवरील रमेश चमत्कारीकरित्या बचावले. ते ब्रिटिश नागरिक आहेत. कुटुंबियांना भेटण्यासाठी ते 45 वर्षीय भाऊ अजय कुमार रमेश याच्यासह भारतात आले होते. दोन्ही भाऊ वेगवेगळ्या रांगेत होते. जेव्हा मी उठून बसलो, तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेह होते. मी एकदम घाबरलो होतो. मी उठून बाहेर पळत सुटलो. माझ्या आजूबाजूला विमानाचे तुकडे होते. त्याचवेळी मला कोणी तरी धरले आणि अँम्बुलन्समध्ये घेऊन रुग्णालयात नेले.