AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Air India Plane Crash : कॉन्फिगरेशन एरर म्हणजे तरी काय? अहमदाबाद विमान अपघातात असेच झाले काय?

Configuration Error : 12 जून 2025 रोजी दुपारी अहमदाबाद येथून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान अपघातग्रस्त झाले. टेकऑफ करताना या विमानात असा काय तांत्रिक बिघाड झाला की इतका भीषण अपघात घडला असा सवाल विचारण्यात येत आहे. हे विमान क्रॅश झालं तरी का?

Air India Plane Crash : कॉन्फिगरेशन एरर म्हणजे तरी काय? अहमदाबाद विमान अपघातात असेच झाले काय?
एअर इंडिया अपघातImage Credit source: गुगल
Updated on: Jun 13, 2025 | 9:41 AM
Share

गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघाताने देशाला मोठा धक्का बसला. अहमदाबाद येथून एअर इंडियाचे विमान क्रमांक AI171 लंडनला जात होते. हे विमान अजून आकाशात पण झेपावले नव्हते की ते नागरी भागात कोसळले. त्यानंतर भीषण आग लागली. त्यात विमान प्रवाशांसह ज्याभागात विमान कोसळले तिथल्या नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. पण बोईंग 787-8, VT-ANB मध्ये असे घडले तरी काय की, टेकऑफनंतर हे विमान कोसळले?

अहमदाबाद विमान अपघातप्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित

एअर इंडियाचे विमान क्रमांक AI171 कोसळले. हे विमान नीटपणे आकाशात सुद्धा झेपावले नाही आणि ते लागलीच कोसळले. त्यामुळे उड्डाण घेण्यापूर्वी या विमानाता काही तांत्रिक बिघाड होता का? विमान उड्डाणापूर्वी नेमकं काय झालं आणि नंतर काय झालं याची बाजू अजून समोर आलेली नाही. त्यामुळे याविषयीचे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यातच कॉन्फिगरेशन एरर विषयीची चर्चा पण पुढे येत आहे. काय आहे ही तांत्रिक अडचण? त्यामुळे होते तरी काय?

Configuration Error म्हणजे काय?

कॉन्फिगरेशन एरर असतो तरी काय? त्याचे विमान उड्डाण आणि त्याच्या कार्याशी काय संबंध आहे. टेकऑफ वेळी जर कॉन्फिगरेशणन एरर असेल तर विमान अपघात होण्याची शक्यता मानण्यात येते. उड्डाणावेळी कॉन्फिगरेशन एरर होत असेल तर त्याचा सरळ अर्थ असा आहे की, विमानाच्या सेटिंग्समध्ये काही तरी चूक आहे, यातील सोयी-सुविधाच नाही तर विमान उड्डाणासाठीच्या तांत्रिक बाबीत अडचणी येतात.

या चुका विविध प्रकारच्या असू शकतात. यामध्ये प्रामुख्याने कमी थ्रस्ट, चुकीच्या सेटिंग्ज, लँडिंग गिअर न उचलणे अथवा वेळेपूर्वी टेकऑफ करणे या गोष्टींचा समावेश असू शकतो. यापैकी कोणतीही चूक झाली तरी विमान उड्डाणापासून ते आवश्यक उंची गाठेपर्यंत अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. अथवा पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटते. त्यामुळे विमान अपघाताची शक्यता अधिक बळावते.

ब्लॅक बॉक्स उघडेल रहस्य?

प्रत्येक विमानात नारंगी रंगाची दोन खास उपकरणं असतात. त्यात पहिले उपकरण हे फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) हे असते, जे विमानाची उंची, वेग, इंजिनची स्थिती आणि पायलटने केलेली प्रत्येक तांत्रिक क्रियेची नोंद ठेवते. तर दुसरे उपकरण म्हणजे कॉपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) हे आहे. यामध्ये पायलटांमधील संभाषण, कंट्रोल टॉवरसोबतचा संवाद, रेडिओवरील संपर्क आणि कॉपिटमधील इतर सर्व आवाज रेकॉर्ड होतो. या दोन उपकरणांना एकत्रितपणे आपण “ब्लॅक बॉक्स” असे म्हणतो. विमान अपघातांची खरी कारणं शोधण्यासाठी हा ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा ठरतो.

मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका
मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका.
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर.
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न...
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्...
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?.
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला.
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.