AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्राईल आमचा देश बळकावतोय…इराणनंतर या निसर्गसंपन्न देशाचा नेतान्याहू यांच्यावर थेट आरोप

इस्राईलच्या शेजारील देशाने ज्यूंवर थेट आरोप केला आहे. इस्राईली पॅलेस्टाईनप्रमाणेच आमचा हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप या देशाच्या विरोधी पक्षाचे नेते स्टेफानोस स्टेफानो यांनी केला आहे.

इस्राईल आमचा देश बळकावतोय...इराणनंतर या निसर्गसंपन्न देशाचा नेतान्याहू यांच्यावर थेट आरोप
| Updated on: Jul 04, 2025 | 9:45 PM
Share

इराणसोबत इस्राईलचा वाद संपला नाही तोवर ज्यू देश इस्राईलवर आणखी एका शेजाऱ्याने आरोप लावायला सुरु केला आहे. हा देश सायप्रस असून येथील विरोधी पक्ष AKEL यांनी दावा केला आहे की इस्राईल त्यांचा देश हिसावून घेत आहे. याचे कारण सायप्रसमध्ये इस्राईली प्रवाशांची संख्या आणि महत्वाच्या ठिकाणांवर जमीन खरेदी करण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे सायप्रस धास्तावला आहे.

सायप्रसमध्ये अलिकडे AKEL पक्षाचे अधिवेशन झाले. त्यात पार्टीचे महासचिव स्टेफानोस स्टेफानू यांनी हा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की इस्राईली नागरिक लागोपाठ संवेदनशील आणि महत्वपूर्ण विभागात जमीन खरेदी करत आहेत. जी राष्ट्रीय सुरक्षेला धोकायदायक बनली आहे. त्यांनी या सरकारशी यावर लवकरच लक्ष देण्यास सांगितले आहे.

पॅलेस्टाईनचा पॅटर्न वापरतोय इस्राईल

स्टेफानू यांनी आरोप केला आहे की हा सर्व इस्राईली लोकांना सायप्रसमध्ये वसवण्याच्या योजनेचा हिस्सा आहे. या अंतर्गत धार्मिक संस्था,जायनिस्ट स्कूल आणि ज्यू पूजा स्थळ बनवले जात आहेत. हा तोच पॅटर्न आहे जो इस्राईलने पॅलेस्टाईनमध्ये वापरला होता.

ते आमचा देश हिसकावत आहेत, सरकार शांत आहे

ते आमचा देश आमच्याकडून हिसकावत आहेत. आणि सरकार शांत बसले आहे. परदेशी नागरिकांवर खासकरुन इस्राईली नागरिकांवर सायप्रसमध्ये संपत्ती खरेदी करण्यावर अंकूश लावावा अशी मागणी स्टेफानू यांनी केली आहे. सायप्रस येथील अनेक विश्लेषकांनी देखील इस्राईली प्रवाशांच्या या प्रवृत्तीला सायप्रस येथील भविष्यातील सार्वभौमत्वास खतरा म्हटले आहे. आणि त्याच सोबत आर्थिक असंतुलनाचा इशाराही दिला आहे.

ज्यू विरोधी ठरवू नका – स्टेफानू

सायप्रस येथील इस्राईलचे राजदूत ओरन अनोलिक यांनी या टीकेला ज्यु विरोधी म्हटले आहे. ते म्हणाले की सायप्रसच्या सार्वजनिक वादात ही भाषा अस्वीकार्य आहे. या आरोपाला उत्तर देताना स्टेफानू यांनी आपल्या पार्टीची बाजू मांडताना इस्राईलच्या धोरणांच्या टीकेला ज्यू विरोधी मानू नये असे म्हटले आहे.

इस्रायल टीका ऐकत नाही

स्टीफानू म्हणाले की इस्राईल कोणतीही टीका सहन करीत नाही आणि सर्वकाही नियंत्रित करू इच्छीतो. गाझामध्ये सुरू असलेल्या नरसंहारावर संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी केलेल्या टीप्पणीवर देखील इस्रायलने ज्यू विरोधी असल्याचे म्हटले आहे असा आरोपही त्यांनी केला. मेहर न्यूजच्या वृत्तानुसार, सुमारे २,५०० इस्रायली सायप्रसमध्ये कायमचे राहतात, परंतु काही तज्ञ्जांचा असा विश्वास आहे की ही संख्या १२,००० ते १५,००० च्या दरम्यान असू शकते, कारण बरेच लोक युरोपियन पासपोर्टद्वारे प्रवेश करतात.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.