AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War | कधी इस्रायल-इराण चांगले मित्र होते, पण आता इतके जानी दुश्मन का?

Israel-Hamas War | इस्रायल-इराणमध्ये कशावरुन बिनसलं? चांगले मित्र आज परस्पराचे इतके हाडवैरी का बनले? मैत्रीत कधी आणि कशामुळे फूट पडली? इस्रायलने सुद्दा नंतर इराणबद्दल खून्नस का ठेवला?

Israel-Hamas War | कधी इस्रायल-इराण चांगले मित्र होते, पण आता इतके जानी दुश्मन का?
reason behind iran and israel dispute
| Updated on: Oct 11, 2023 | 7:53 PM
Share

जेरुसलेम : इराण आणि इस्रायलमध्ये कधीकाळी घट्ट मैत्री होती. इराणकडून तेल खरेदीत इस्रायल अव्वल होता. काही वर्ष दोन्ही देशांमध्ये खूप चांगली मैत्री चालली. पण आज दोन्ही देश परस्परांचे कट्टर हाडवैरी आहेत. इराणच्या इस्रायल विरोधात छुप्या कारवाया चालूच असतात. नुकताच हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून घातलेला हैदोस त्याच उत्तम उदहारण आहे. इराणची फूस असल्याशिवाय हमास इतकी हिम्मत करुच शकत नाही. त्याशिवाय इस्रायल लागून असलेल्या लेबनॉनच्या सीमेवर इराणने हेजबोला नावाची दहशतवादी संघटना उभी केलीय. हे दोन्ही दहशतवादी गट आज इस्रायलच्या अस्तित्वावर उठले आहेत. त्याचवेळी इस्रायलचा सुद्धा इराणला अणवस्त्र संपन्न राष्ट्र होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न आहे. कधीकाळचे हे चांगले मित्र आज परस्परांचे इतके दुश्मन का झाले? त्यामागे काय कारण आहे? जाणून घ्या.

इराणमध्ये आधी शाह रजा पहलवी यांचं शासन होतं. पण त्याविरोधात इराणमध्ये उठाव झाला. शाह रजा पहलवी यांनी आपली गादी सोडावी लागली. शिया नेते अयातुल्ला खुमैनी इराणचे प्रमुख बनले. तिथूनच दोन्ही देशाचे संबंध बिघडले. नवीन राष्ट्रप्रमुख अयातुल्ला खुमैनी यांनी इराणला इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित केलं. अमेरिकेबरोबर इराणचे संबंध बिघडले. अमेरिका आणि इस्रायलमध्ये पहिल्यापासून चांगली मैत्री आहे. इराणने इस्रायल बरोबर शत्रुत्व ओढवून घेतलं, ते याच कारणामुळे. इराणच्या मनात इस्रायलबद्दल प्रचंड राग आहे. वेळोवेळी तो दिसूनही आला. सत्ता संभाळताच इस्रायलच दूतावास ज्या इमारतीत होतं, त्याच ठिकाणी पॅलेस्टाइनच दूतावास इराणने सुरु केलं. त्या दूतावासाच उद्घाटन करण्यासाठी पॅलेस्टाइन मुक्ती संघटनेने प्रमुख यासर अराफात अचानक इराणध्ये दाखल झाले होते.

….म्हणून इस्रायलने इराणबद्दल खून्नस ठेवला

इस्रायली दूतावासातील जवळपास तीन डझन अधिकारी-कर्मचारी इराणध्ये कसाबसा स्वत:चा जीव वाचवत पळत होते. अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर ते इराणमधून सुरक्षितपणे बाहेर निघाले. सत्ता परिवर्तनानंतर अचानक झालेल्या या बदलामुळे इस्रायलच खूप मोठ आर्थिक नुकसान झालं. त्यामुळे इस्रायलने सुद्धा इराणबद्दल मनात नंतर राग धरला. इस्रायल, अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांना इराणचे आजचे शासक मुस्लिमांचे सर्वात मोठे शत्रू मानतात. इराणच्या सुरक्षेसाठी त्यांना धोकादायक मानल जातं. इराणने पॅलेस्टाइटनच्या स्वातंत्र्याचा मुद्दा आपल्या अजेंड्यात टॉपवर ठेवला आहे. 1982 साली इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केला, त्यावेळी इराणने आपलं सैन्य सुद्धा लढाईत उतरवलं होतं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.