AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Attack Houthi : इस्रायलच सर्वात मोठं अपयश, सगळी ताकद झोकून पण या देशाचा एकही कमांडर का मारता आला नाही?

Israel Attack : इस्रायल हा देश आपल्या शत्रुविरोधात पूर्ण व्यवस्थित प्लान करुन ऑपरेशन करण्यासाठी ओळखला जातो. इस्रायलच्या प्रत्येक ऑपरेशनमध्ये मोसादचा रोल असतो. इस्रायलचा सहसा कुठलाही हल्ला फेल जात नाही. पण इस्रायलल नुकतच एका मोठ्या अपयशाला सामोर जावं लागलं. सगळी ताकद झोकून पण इस्रायलला या देशाचा एकही कमांडर मारता आला नाही.

Israel Attack Houthi  : इस्रायलच सर्वात मोठं अपयश, सगळी ताकद झोकून पण या देशाचा एकही कमांडर का मारता आला नाही?
israel
| Updated on: Aug 26, 2025 | 10:31 AM
Share

इस्रायलच्या रडारवर आता हुती फायटर्स आहेत. रविवारी 24 ऑगस्ट रोजी इस्रायलने हुती फायटर्स विरोधात मोठं ऑपरेशन चालवलं. इस्रायलने हुतीचे मिलिट्री चीफ आणि येमेनच्या राष्ट्रपतींना मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यात इस्रायलला यश मिळालं नाही. इस्रायलच्या या ऑपरेशनमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. पण हुतीचा एकही कमांडर मारला गेला नाही. प्रश्न निर्माण होतोय की, संपूर्ण ताकद झोकल्यानंतरही इस्रायलला हुतीचा एकही कमांडर का मारता आला नाही?.

इस्रायलच्या कुठल्याही ऑपरेशनचा यशाचा आलेख उंच असतो. ते असच कुठलं ऑपरेशन करत नाहीत. पक्की गोपनीय माहिती आणि तयारीनिशी इस्रायल आपल्या शत्रुवर तुटून पडतो. इराण याचं एक उदहारण आहे. दोन महिन्यापूर्वी इराण विरुद्ध युद्ध सुरु केलं, त्यावेळी इस्रायलने इराणच्या बड्या लष्करी अधिकाऱ्यांना टिपलं होतं.

अपयशाचं पहिलं कारणं

हुती फायटर्स अरबी भाषा बोलतात. इस्रायल डिफेन्स फोर्स आणि त्यांच्या हेरांना ही भाषा डिकोड करताना अडचणी येत आहेत. इस्रायल सरकारने अलीकडेच सर्व इंटेलिजन्स अधिकाऱ्यांना अरबी भाषा शिकायला सांगितली.

मोसादसमोर अडचण काय?

हुती फायटर्स कोडवर्डमध्ये बोलतात. त्यामुळे त्यांच्या हालचाली मोसाद किंवा सीआयएच्या अधिकाऱ्यांना सहजतेने समजत नाहीत. त्यामुळेच तयारी असूनही इस्रायलला हुतीच्या मोठ्या म्होरक्यांना संपवता येत नाहीय, त्यामागे हे एक कारण आहे.

इराणमध्ये कसं यश मिळालं?

इराण आणि अन्य देशातील यशस्वी ऑपरेशन्ससाठी इस्रायलने अनेक वर्ष तयारी केली होती. हेरांची एक ब्रिगेडच तयार केलेली. येमेनमध्ये अशा प्रकारची कारवाई करण्यासाठी तयारी सुरु आहे.

मोसादच पुढचं प्लानिंग काय?

हुतीसाठी महत्वाच्या ठिकाणांची यादी मोसादचे हेर तयार करत आहेत. अल अरबियाने इस्रायली सूत्रांच्या हवाल्याने हे सांगितलं. इस्रायल एकाचवेळी या ठिकाणी हल्ला करेल असं रिपोर्टमध्ये म्हटलय.

का टार्गेट करता येत नाहीय?

इराण आणि हमासमध्ये कमांडर तसच अन्य सैन्य पदांवर नियुक्ती करण्यात आली होती. पण हुतीमध्ये असं नाहीय. त्यामुळे इस्रायली डिफेन्स फोर्सला हुतीच्या कमांडर्सना टार्गेट करता येत नाहीय.

पडद्यामागे राहून ऑपेरशन चालवतात

हुतीचा मिलिट्री चीफ अल हुती शिवाय कुठल्याही अन्य कमांडरबद्दल इस्रायलकडे ठोस खात्रीलायक माहिती नाहीय. हुतीचे सर्व लोक एकसारखेच आहेत. पडद्यामागे राहून ऑपेरशन चालवतात. इस्रायलवर मिसाइल हल्ला करतात.

रविवारी किती ठिकाणी हल्ला केला?

इस्रायलने रविवारी येमेनमध्ये हुतीच्या तीन ठिकाणांवर हल्ले केले. पहिला हल्ला राष्ट्रपती भवनाजवळ, दुसरा सनाच्या वीजकेंद्रावर आणि तिसरा हल्ला इंधन साठा सुविधा केंद्रावर केला. यात 6 लोकांचा मृत्यू झाला.

अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी.
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली.