AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण आणि अमेरिका युद्ध थांबणार, या तारखेला होणार घोषणा, थेट..

इराण आणि अमेरिका युद्धाला 28 फेब्रुवारी 2026 रोजी सुरूवात झाली. यादरम्यानच आता इराण आणि अमेरिका युद्ध कधी थांबणार याबद्दल अत्यंत मोठी अपडेट पुढे आलीये. यामुळे शेवटी जगाने सुटकेचा निश्वास घेतला आहे.

इराण आणि अमेरिका युद्ध थांबणार, या तारखेला होणार घोषणा, थेट..
America and Iran war stop
| Updated on: Mar 24, 2026 | 12:11 PM
Share

इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून 28 फेब्रुवारी 2026 रोजी मोठा हल्ला इराणवर केला. या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. युद्ध 4 आठवडे चालण्याचा अंदाज डोनाल्ड ट्रम्प यांचा होता. मात्र, त्यांनी विचार केला नाही, अशा भयंकर रूपात इराण दिसला. इराणने या 24 दिवसात अमेरिकेला आणि इस्त्रायलला सळो की पळो करून सोडले. शेवटी 5 दिवसांकरिता अमेरिकेकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. मात्र, इराणकडून स्पष्ट करण्यात आले की, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत युद्ध बंदी नसणार आहे. 48 तासांचा वेळ अमेरिकेकडून इराणला होर्मुज खाडी खुला करण्याकरिता देण्यात आला होता. मात्र, यानंतर इराणने थेट इशारा देत म्हटले की, अशा धमक्या देत असाल तर होर्मुज खाडी पूर्णपणे बंद करू. यानंतर अमेरिकेने थेट पाच दिवसांची युद्धबंदी जाहीर केली.

यादरम्यानच आता इस्त्रायलच्या अधिकाऱ्याने मोठा दावा केला. इस्त्रायलच्या अधिकाऱ्याने म्हटले की, इराण आणि अमेरिका जे युद्ध सुरू आहे ते 9 एप्रिल 2026 रोजी संपणार आहे. ठरलेल्या प्लॅनिंगनुसार सर्वकाही व्यवस्थित राहिले तर 9 एप्रिलला युद्ध संपेल. मिळालेल्या माहितीनुसार, इराण आणि अमेरिका युद्धाच्या समाप्तीबद्दल पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे बैठक होऊ शकते.

रॉयटर्सने असेही वृत्त दिले आहे की, दोन्ही बाजूंमधील चर्चेसाठी इस्लामाबादची निवड केली जाऊ शकते. 9 एप्रिल रोजी युद्ध संपवण्याची तारीख ठरवण्याचे अत्यंत मोठे कारण आहे. 2025 च्या अखेरीस इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने एका विशेष सन्मानाने त्यांना गाैरवले जाणार असल्याचे जाहीर केले होते.

9 एप्रिलला युद्ध संपले तर इस्त्रायल साधारणपणे 21 ते 22 एप्रिलदरम्यान देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘इस्रायल पुरस्कार’ डोनाल्ड ट्रम्प यांना देणार आहे आणि ती संधी डोनाल्ड ट्रम्प यांना घालवायची नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 एप्रिल रोजीच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्ध समाप्तीबद्दल घोषणा होऊ शकते. मात्र, यादरम्यान प्रश्न तोच निर्माण होतो की, इराणच्या मागण्या अमेरिकेकडून मान्य होणार का? कारण युद्ध थांबवण्याकरिता इराणकडून काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.

Follow Us
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार