भारताच्या मित्राने चीनकरिता बनवला मास्टर प्लान, जग बघतच राहिले, थेट समुद्राच्या..

इराण आणि अमेरिका युद्धात ऊर्जेचे मोठे संकट आहे. त्यामध्येच आता मोठा निर्णय रशियाने घेतला. रशियाच्या या निर्णयानंतर चीनचाी झोप उडाल्याचे बघायला मिळतंय. जगात मोठा हाहाकार उडाला आहे. पुतिन चीन दाैऱ्यावर आहेत.

भारताच्या मित्राने चीनकरिता बनवला मास्टर प्लान, जग बघतच राहिले, थेट समुद्राच्या..
Gas Pipeline Russia
| Updated on: May 19, 2026 | 12:40 PM

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध सुरू असताना मोठा गेम रशियाने केला. रशियाने पूर्ण समीकरणेच बदलली. होर्मुज खाडी बंद आहे. ज्यामुळे एलपीजी गॅसची मोठी समस्या आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जग तणावात असतानाच दुसरीकडे मास्टर गेम रशिया आण चीन यांच्याकडून खेळण्यात आला. ज्याने अमेरिकेची झोप उडाली. एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे चीनपुढे मोठे संकट आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन एक मेगा प्लॅन घेऊन चीनच्या दाैऱ्यावर जात आहेत. व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बैठक होईल. महत्वाकांक्षी पाईपलाईन पावर ऑफ सायबेरिया 2 च्या मुद्द्यावर चर्चा होईल. पुतिन गेल्या काही दिवसांपासून चीनला ऊर्जेच्या मुद्द्यात मदत करत आहेत. ही गॅस पाईपलाईन रशियाच्या सायबेरियाईहून मंगोलियाच्या मार्ग चीनला जाईल. ही योजना पुतिन यांनी तयार केली.

सरकारच्या जवळच्या सूत्रांनुसार, सागरी मार्ग बंद झाल्यापासून चिनी अधिकाऱ्यांनी रखडलेल्या प्रकल्पावरील वाटाघाटींना गती देण्यास सुरूवात केली. कारण आता त्यांच्यासमोर सुरक्षित पर्यायांचा तीव्र अभाव आहे. सप्टेंबरपर्यंत गॅसच्या किमतींवर अंतिम करार करणे हे रशियाचे मुख्य उद्दिष्ट आहे. जेणे करून त्यांना या पाईपलाईनच्या कामाला सुरूवात करता येईल.

चीन आपल्या ऊर्जेची मागणी आखाती देशांकडून पूर्ण करतो. समुद्री मार्गानेच चीनमध्ये कच्चे तेल आणि एलपीजी गॅस पोहोचतो. मात्र, होर्मुज खाडी बंद असल्याने मोठी समस्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 33 टक्के स्वस्त गॅस रशिया चीनला विकणार आहे. चीन आणि रशियातील ही मोठ होणारी भागीदारी पाहून अमेरिकेला मोठे टेन्शन आले. भारताचा मित्र चीनच्या मदतीला धावल्याचे बघायला मिळतंय.

पुतिन चीन दाैऱ्यानंतर भारताच्या दाैऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान काही महत्वाच्या विषयांवर करार होतील. फक्त चीनच नाही तर भारतालाही मोठ्या संख्येने तेलाचा पुरवठा रशियाकडून केला जात आहे. भारताला हवे तेवढे तेल रशिया देत आहे. अमेरिकेने रशियाच्या तेलावरील निर्बंधांनामध्ये सूट दिली. ज्यामुळे पुढील एक महिना भारत आरामात रशियाकडून तेल खरेदी करू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us