AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे पदावरुन पायउतार, विनम्रपणे झुकून जनतेची माफी

65 वर्षीय शिंजो आबे गेल्या अनेक वर्षांपासून 'अल्सरेटिव्ह कोलायटीस' या आतड्यांसंबंधी आजाराने त्रस्त आहेत.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे पदावरुन पायउतार, विनम्रपणे झुकून जनतेची माफी
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Aug 28, 2020 | 4:16 PM
Share

टोक्यो : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे पदावरुन पायउतार झाले आहेत. वैद्यकीय कारणास्तव आबे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असल्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. यावेळी विनम्रपणे झुकून त्यांनी जपानी जनतेची माफी मागितली. (Japan prime minister Shinzo Abe announces to step down due to health problems from ulcerative colitis)

आपले आजारपण कोणत्याही निर्णय प्रक्रियेच्या आड येऊ नये, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधानपदाचा कालावधी पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल जपानी नागरिकांची दिलगिरी त्यांनी व्यक्त केली.

65 वर्षीय शिंजो आबे गेल्या अनेक वर्षांपासून ‘अल्सरेटिव्ह कोलायटीस’ या आतड्यांसंबंधी आजाराने त्रस्त आहेत. परंतु अलिकडे आपली प्रकृती आणखी बिकट झाल्याचे ते म्हणाले. आबे यांच्या आतड्याला आलेल्या सुजेमुळे अल्सर झाल्याची माहिती आहे. त्यावर उपचार सुरु असून त्यामुळे पंतप्रधानपदाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

“कार्यकाळ संपण्यास एक वर्ष बाकी असताना राजीनामा दिल्याबद्दल जपानी नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो. विशेषतः कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर विविध धोरणे अद्याप लागू होण्याच्या प्रक्रियेत आहेत, अशा वेळी आपण पायउतार झालो” असं म्हणत त्यांनी पारंपरिक जपानी पद्धतीनुसार वाकून जनतेला नमन केले.

शिंजो आबे गेल्या वर्षीच सर्वात दीर्घ काळासाठी जपानचे पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरले होते. त्यांचा सध्याचा कार्यकाळ 2012 मध्ये सुरु झाला. म्हणजेच गेली आठ वर्ष त्यांनी जपानच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. उत्तराधिकारी निवडला जाईपर्यंत ते आपल्या पदावर राहतील. सप्टेंबर 2021 मध्ये त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपणार होता.

अल्सरेटिव्ह कोलायटीसशी झगडताना 2007 मध्येही त्यांनी पंतप्रधानपदाच्या आधीच्या कार्यकाळात अचानक राजीनामा दिला होता. हा आजार त्यांना किशोरवयीन काळापासूनच जडला आहे.

शिंजो आबे हे एक कट्टर पुराणमतवादी आणि राष्ट्रवादी नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘आबेनॉमिक्स” (Abenomics) म्हणून त्यांचे आक्रमक आर्थिक धोरण ओळखले जाते.

(Japan prime minister Shinzo Abe announces to step down due to health problems from ulcerative colitis)

Follow Us
मालाडमध्ये छठपूजेचा उत्साह! मनसे नेत्यांकडून जय्यत तयारी...
मालाडमध्ये छठपूजेचा उत्साह! मनसेच्या सुरेखा परब यांच्याकडून जय्यत तयारी, जोरदार बॅनरबाजी
मुंबईनंतर पुण्यातही मफलरवाला पोस्टर; अजितदादांचा अपघात की घातपात?
Ajit Pawar Poster Controversy : मुंबईनंतर पुण्यातही मफलरवाला पोस्टर; अजितदादांचा अपघात की घातपात? राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादांचा अपघात की घातपात? मुंबईत मफलर असलेलं पोस्टर झळकलं....
Ajit Pawar : अजितदादांचा अपघात की घातपात? मुंबईत मफलर असलेलं पोस्टर झळकलं; 16 नोव्हेंबरला रोहित पवार मोठा खुलासा करणार?
भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना....
Supriya Sule On NCP Merger : भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना पूर्णविराम!
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; पटेल भेटीवर...
Supriya Sule On Praful Patel Meeting : अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; प्रफुल्ल पटेल भेटीवर सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
Supriya Sule On NCP Merger : विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण, राष्ट्रवादीच्या चर्चांना पूर्णविराम?
ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले
Aaditya Thackeray : ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; राऊत नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून शिंदेंचा
Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
Jensen Huang : CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?