जपान लागोपाठच्या भूकंपाच्या झटक्यांनी हादरला, सुनामीचे संकेत आणि बाबा वेंगाची ती भविष्यवाणी
प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबावेंगा याने वर्तवलेल्या भाकितानुसार जपानमध्ये भूकंपाचे धक्के सुरु झाले आहेत. साल २०२५-२६ जगात नैसर्गिक संकट आणि युद्धस्थिती निर्माण होईल असे भविष्य बाबा वेंगाने वर्तविले होते.

जपानच्या पूर्व किनाऱ्यावर आज मोठा भूकंप आला. याची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल होती. इवाते प्रांताच्या यमादा शहरापासून १२६ किलोमीटर पूर्वेला समुद्राच्या आत खोलवर याचे केंद्र आहे. ही घटना रिंग ऑफ फायर क्षेत्रात झाली आहे. येथे नेहमीच भूकंप येत असतात. भूकंपानंतर सुनामीची सूचना जारी झाली आहे.या भूकंपाने भविष्यवेत्ता बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरल्याचे मानले जात आहे.
९ नोव्हेंबर २०२५ रोजी इवाते प्रांताच्या जवळ ६.८ तीव्रतेचा भूकंप आला आहे. ज्याचे केंद्र समुद्रात १० किमी खोल होते. गेल्या २४ तासात जपानमध्ये ५ प्लस तीव्रतेचे ५ भूंकप आले आहेत. एकूण ७ भूकंपाचे धक्के बसले आहेत. रिंग ऑफ फायरमध्ये प्लेट टेक्टॉनिक्सच्या कारणाने भूकंपाच्या हादऱ्यांची मालिकाच सुरु झाली. सुनामीची सूचना जारी झाली आहे. त्यामुळे सावधानता बाळगली जात आहे.जपानच्या हवामान खात्याने किनारी प्रदेशातील लोकांना सुरक्षित स्थळी आसरा घेण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
भूकंप नेमका केव्हा आला
हा भूकंप आज सायंकाळी ५.०३ वाजता स्थानिक वेळ ( जपानची वेळ ) आाला. याचे केंद्र इवाते प्रांताच्या जवळ उत्तर प्रशांत महासागरात होते. भूकंपाचा धक्का इतका मोठा होता की आजूबाजूच्या विभागात कंपने जाणवली. मियाको आणि यमादा सारख्या किनारी भागात १ मीटरपर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा इशारा देण्यात आला आहे.
इतका मोठा धक्का बसूनही नशिबाने जास्त नुकसान झालेले नाही. कोणत्याही प्राणहानीची बातमी अद्याप आलेली नाही. काही छोटे-मोठे झटक जाणवले.आता आफ्टरशॉकवर टेहळणी केली जात आहे.संशोधकांच्या मते हे क्षेत्र खूपच सक्रीय असल्याने सर्तक रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या २४ तासात किती झटके आले ?
गेल्या २४ तासांत या विभागात भूकंपाचे अनेक झटके लागोपाट आले. बातमीनुसार मुख्य झटका ६.८ रिश्टर स्केलचा होता.त्याच्या आधी ५ भूकंपाचे झटके ५.० तीव्रतेहून अधिकचे होते.
सकाळी ६.०४ वाजता ५.४ तीव्रतेचा झटका
सकाळी ७.३३ वाजता ५.० तीव्रतेचा झटका
सकाळच्या वेळी ५.६ तीव्रतेचा झटका
रात्री १२.१७ वाजता (युटीसी ) ५.१ तीव्रतेचा झटका
एक आणखी ५.१ तीव्रतेचा, जो मुख्य भूकंपाच्या आधी आला.
याशिवाय मुख्य भूकंपाच्या धक्क्या आधी किमान एक ५.१ तीव्रतेचा आफ्टरशॉक आला. गेल्या २४ तासात किमान ७ भूकंपाचे ५.० वा त्याहून अधिक जास्त तीव्रतेच धक्के नोंदवले गेले. छोट्या भूकंपाची संख्या आणखी जास्त होऊ शकते. हा स्वार्म ( समुह ) अचानक सुरु झाला.त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
भूकंपाला कारण काय ?
जपानचे रिंग ऑफ फायर नावाचे क्षेत्र भूकंपासाठी ओळखले जाते. येथे प्रशांत प्लेट (टेक्टॉनिक प्लेट) ओखोटस्क प्लेटच्या खाली घुसली आहे.यामुळे टेन्शन वाढते. अचानक हा दाब रिलीज झाल्यानंतर भूकंपाचे हादरे बसतात. ही मालिका त्याची टेन्शनच्या छोट्या-छोट्या रिलीजचा परिणाम आहे.संशोधकांचे म्हणणे आहे की यामुळे मोठा भूकंप येण्याचा धोका वाढतो. परंतू योग्य वेळ सांगणे कठीण आहे. जपानसारख्या देखात चांगली तयारी आणि सावधानतेचे उपाय केल्याने हानी कमी होते.
