Jyoti Malhotra : 6 बंदूकधाऱ्यांच्या गराड्यात फिरली, ज्योतीने पाकड्यांच्या बाजारातून काय काय घेतलं ?
एका स्कॉटिश व्लॉगमध्ये ज्योती मल्होत्रा लाहोरच्या अनारकली मार्केटमध्ये फिरताना दिसली. तेथे तिच्यासोबत 6 सशस्त्र रक्षक होते. या हायटेक सुरक्षेने सर्वांनाच धक्का बसला आणि त्यानंतर ज्योतीवरील संशय आणखी वाढला. ज्योतीने पाकिस्तानच्या अनारकली बाजारात नेमकं काय खरेदी केलं ?

पाकिस्तानासाठी हेरगिरी करत भारताची संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप असेलल्या ज्योति मल्होत्राचे नवनवे कारनामे समोर येतच आहेत. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या ज्योतीबद्दल बरीच धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आधी अटक, त्यानंतर आता एका स्कॉटिश व्लॉगरचा मोठा खुलासा. खरंतर या व्लॉगमध्ये ज्योती मल्होत्रा अनारकली बाजारात फिरताना दिसली. या दरम्यान सर्वात धक्कादायक गोष्ट होती ती म्हणजे तिच्या आजूबाजूला असलेली सुरक्षा. त्या बाजारात तिच्यासोबत 6 बंदूकधारी होते. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे असलेली शस्त्र अतिशय हायटेक होती. हैराण करणारी गोष्ट म्हणजे, त्यांच्या जॅकेटच्या मागच्या बाजूला ‘नो फिअर’ असं लिहिलेलं होतं. तेव्हापासूनच, पाकिस्तान सरकार ज्योतीवर इतकं दयाळू का होते असे प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्योतीने अनारकली मार्केटमधून काय खरेदी केली, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.
गुरुद्वारा आणि वाल्मिकी मंदिराला भेट दिल्यानंतर, ज्योतीने अनारकली बाजारात खरेदी सुरू केली. इथे दिल्लीसारखं वातावरण असल्याचं ती म्हणाली. अनारकली बाजारात पोहोचताच ती लोकांमध्ये मिसळली. तिथे तिची त्याच स्कॉटिश व्लॉगरशी भेट झाली ज्याच्या व्हिडिओमध्ये ज्योतीच्या सुरक्षेबद्दल माहिती मिळाली होती. यानंतर ज्योती एका कॉस्मेटिक दुकानात गेली, जिथे तिने स्वतःसाठी कानातले पाहिले पण ते कानातले तिने विकत घेतल नाहीच. कानातले पाहिल्यानंतर ती स्वतःसाठी पाकिस्तानी पंजाबी शूज पाहण्यासाठीही गेली. मग ती पाकिस्तानी सूटच्या शोरूममध्ये गेली.
ज्योति आणि टीमने काय केली खादाडी ?
बाजारात फिरत असताना, ज्योतीने अनेक भाजी विक्रेत्यांना हाय-हॅलो म्हटले. यावेळी, तिने तिच्यासोबत असलेल्या बंदूकधाऱ्यांना गमतीने विचारलं, की इथे भाज्यांसोबत कोथिंबीर मोफत मिळते का? यावर गार्ड म्हणाला, नाही. मग तिला तिथे अनेक खाद्यपदार्थ दिसले. यामध्ये अंड्याचे पकोडे आणि अंड्याचे टिक्की यांचा समावेश होता. यानंतर, ज्योती पुढे गेली आणि समोशाचं दुकान गाठलं. तिथे तिने आणि तिच्या टीमने लाहोरी चणे-समोसे खाल्ले. काहींनी टिक्कीही खाल्ली. इथे भारतीय चलन स्वीकारले जाईल का असा सवाल ज्योतीने त्या दुकानात विचारला. मात्र काही वेळाने, दुकानदारांनी भारतीय चलन स्वीकारण्यास सहमती दर्शविली.पण ज्योतीने त्याला भारताच चलन नव्हे तर फक्त पाकिस्तानी चलनात पैसे दिले. यानंतर ती पुन्हा अनेक रेस्टॉरंटमध्ये गेली.
काय केली खरेदी ?
खाण्यापिण्याची दुकाने पाहिल्यानंतर ज्योतीने कपडे खरेदी केले. तिने स्वतःसाठी एक सूट खरेदी केला. तसंच तिच्या मैत्रीणीसाठी पिवळ्या रंगाचा सूट आणि स्वतःसाठी काळ्या रंगाचा सूट विकत घेतला. त्यानंतर ती बूट खरेदी करायला गेली. तिथे फिरताना ज्योतीला भरतकाम केलेल्या जूती आवडल्या. ज्योतीने तिच्या संपूर्ण टीमसोबत स्वतःसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी बूट खरेदी केले. त्याच दरम्यान तिला कॉलेजमधील दोन मुली भेटल्या. ज्योती त्यांच्याशी बोलली आणि त्यांना भारतात येण्याचे आमंत्रणही दिले. त्यानंतर ज्योतीने तिच्यासाठी सूरमा खरेदी केला आणि अनारकाली बाजारातून परत जाताना तिने क्ले देखील विकत घेतला, तिने बानो बाजाराबद्दलही माहिती दिली. भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे आणि लढाई थांबली पाहिजे, असंही ती इखथे फिरताना म्हणाली. संपूर्ण बाजारपेठेत फिरल्यानंतर, ज्योती बसमध्ये चढली आणि परत गेली. पण या संपूर्ण व्हिडिओमध्ये ज्योतीसोबत फिरणारे बंदूकधारी कोण आहेत? ते काही उघड झालं नाही.
