तालिबानराजमध्ये अफगाणिस्तानात ‘या’ 4 शब्दांचं महत्त्व वाढलं, काय आहे अर्थ? समजून घ्या

| Updated on: Sep 02, 2021 | 8:01 AM

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने लोकनियुक्त सरकारला उलथवून टाकत शस्त्रांच्या जोरावर सत्ता काबिज केलीय. मात्र, या सत्तांतरानंतर लगेचच अफगाणिस्तानमधील शासन व्यवस्थेत काही शब्दांना प्रचंड महत्त्व आलंय.

तालिबानराजमध्ये अफगाणिस्तानात या 4 शब्दांचं महत्त्व वाढलं, काय आहे अर्थ? समजून घ्या
Follow us on

काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने लोकनियुक्त सरकारला उलथवून टाकत शस्त्रांच्या जोरावर सत्ता काबिज केलीय. मात्र, या सत्तांतरानंतर लगेचच अफगाणिस्तानमधील शासन व्यवस्थेत काही शब्दांना प्रचंड महत्त्व आलंय. यापुढील काळात हेच शब्द अफगाणिस्तानचं भविष्य ठरवतील की काय अशी परिस्थिती तयार झालीय. त्यामुळेच सध्या हे निर्णयाक शब्द आणि त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. चला तर पाहुयात तालिबान राजमधील हे शब्द कोणते आणि त्याचा अर्थ काय?

शरिया

अफगाणिस्तानमध्ये तालिबान राज आल्यानंतर सर्वाधिक चर्चा आहे ती शरिया या शब्दाची. शरिया हा अरबी शब्द आहे आणि त्याचा अर्थ धार्मिक कायद्यानुसार वर्तन असा आहे. तालिबानने अफगाणिस्तान मुस्लीम कायद्यानुसार म्हणजेच कुराण आणि हदिसमध्ये सांगितल्याप्रमाणे चालेल असं घोषित केलंय. सौदी अरब शरियाप्रमाणेच काम करतो.

मुजाहिद

मुजाहिद किंवा मुजाहिदीन हा शब्द नेहमीच तालिबानी दहशतवाद्यांसाठी वापरला जातो. हा शब्द अरबी आहे. हा शब्द जोहद पासून बनला आहे. जोहद म्हणजे प्रयत्न करत राहणारा असा आहे. मुस्लीम धर्मात इस्लाम धर्माचा प्रसार करण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मुजाहिद म्हटलं जातंय. याचा दुसरा अर्थ न्याय पोहचवणारा असाही होतो. अनेक मुस्लीम कट्टरतावादी स्वतःला मुजाहिदीन म्हणून घेतात त्यामुळे हा शब्द बदनाम होऊन दहशतवाद्यांशी जोडला जातो.

शुरा

अफगाणिस्तानमध्ये कसं सरकार असेल याबाबत शुरा केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा तालिबानने केलीय. त्यामुळे शुरा शब्दाचं महत्त्व अधिक वाढलं. या शुराचा अर्थ आहे सल्लामसलत करणे.

इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तान

तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर लगेचच अफगाणिस्तानचं नाव बदलून इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तान असं करण्यात आलं. अमिरात हा शब्द अमीरपासून बनलाय. अमीर म्हणजे प्रमुख.

हेही वाचा :

Afghanistan Crisis: ज्या विमानात बसण्यासाठी एसटीसारखी झुंबड उडाली, विमानात काय स्थिती होती? व्हायरल फोटो पाहिले का?

“अश्रफ गनी न लढताच पळाले त्यांना प्रश्न विचारा”, अफगाण स्थितीवर जो बायडन नेमकं काय म्हणाले?

एअर फोर्सचं विमान 120 नागरिकांना घेऊन भारतात दाखल, भारत माता की जयच्या घोषणेनं मायभूमीत स्वागत

व्हिडीओ पाहा :

Know which are important words in Afghanistan after Taliban take over