AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अश्रफ गनी न लढताच पळाले त्यांना प्रश्न विचारा”, अफगाण स्थितीवर जो बायडन नेमकं काय म्हणाले?

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर अफगाण राष्ट्रपती अश्रफ गनी जीव वाचवत पळाले. यावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सडकून टीका केलीय. अश्रफ गनी न लढताच पळाले. त्यांना याबाबत प्रश्न विचारले पाहिजे, असं मत जो बायडन यांनी व्यक्त केलं.

अश्रफ गनी न लढताच पळाले त्यांना प्रश्न विचारा, अफगाण स्थितीवर जो बायडन नेमकं काय म्हणाले?
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 8:29 AM
Share

वॉशिंग्टन : अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर अफगाण राष्ट्रपती अश्रफ गनी जीव वाचवत पळाले. यावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सडकून टीका केलीय. अश्रफ गनी न लढताच पळाले. त्यांना याबाबत प्रश्न विचारले पाहिजे, असं मत जो बायडन यांनी व्यक्त केलं. अफगाणमधील युद्ध पाहणारा मी अमेरिकेचा चौथा राष्ट्रपती आहे. आम्ही भरपूर सैन्य गमावले. आता आमचे सैन्य अजून धोका पत्करु शकत नाही, असंही बायडन यांनी नमूद केलं.

जो बायडन म्हणाले, “अश्रफ गनी न लढताच पळाले. त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती खूप गंभीर आहे. आम्ही दहशतवाद विरुद्ध नेहमी लढाई केली आणि निर्णय सुद्धा घेतले. आम्ही अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर बारीक नजर ठेऊन आहोत. अफगाणिस्तानमध्ये अविश्वासाचे संकट आहे. आमचे सैन्य अजून धोका पत्करू शकत नाही. आम्ही भरपूर सैन्य गमावले आहे. तालिबानशी युद्ध अमेरिकेच्या फायद्याचे नाही. अफगाणिस्तानमध्ये आम्ही भरपूर पैसा खर्च केला आहे. अमेरिका कधीही हिम्मत हरलेला नाही.”

“आमच्या निर्णयाला नाव ठेवलं जाईल, पण अमेरिकेच्या नागरिकांसाठी हा निर्णय योग्य”

“मला माहित आहे आमच्या निर्णयाला नाव ठेवतील, पण अमेरिकेच्या नागरिकांसाठी हा योग्य निर्णय आहे. आम्हाला आमच्या लोकांची सुखरूप घरवापसी पाहिजे आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे 6000 सैनिक आहेत. अजून 1000 सैनिक पाठवणार आहोत. अजून काही दिवस हे सैन्य तेथे ठेवणार आहोत. हे सैनिक विमानतळ आणि नागरिकांची सुरक्षा करतील. ट्रुम्प यांनी तालिबान बरोबर सामंजस्य केला आहे. आम्ही शरणार्थी लोकांची मदत करणार आहोत,” असं जो बायडन यांनी सांगितलं.

“अफगाण सरकारमध्ये भ्रष्टाचार ही मोठी समस्या”

“मी हे युद्ध बघणारा अमेरिकेचा चौथा राष्ट्रपती आहे. अफगाण सैन्य तालिबानशी लढू शकत नाही. अफगाण सरकारमध्ये भ्रष्टाचार ही मोठी समस्या आहे. अफगाणिस्तानमध्ये अचानक परिस्थिती बदलली. आमचे ध्येय अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करणे हे नव्हते. येणाऱ्या दिवसात आम्ही मदत करू,” असंही बायडन यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीनं देश सोडताना काय काय सोबत नेलं? पैसा, गाड्यांबाबत पहिल्यांदाच रिपोर्ट

Know This : तालिबानच्या उदयापासून ते अफगाणिस्तानवर सत्ता मिळवण्याचा प्रवास कसा ?

Afghanistan Crisis : तालिबानकडून अफगाणिस्तानची सत्ता काबीज, आता काय असेल युद्धग्रस्त देशाचे भविष्य?

व्हिडीओ पाहा :

Know what is the stand of American president Joe Biden on Afghanistan

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.