AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या शेजारी देशांमध्ये मोठा भूकंप, कोलकातामध्ये जोरदार धक्के, तब्बल 20 सेकंद जमीन..

Earthquake News : भूकंपाची तीव्रता 5.7 होती. हा भूकंप झाला आणि सुमारे 20 सेकंद जमीन हादरली. भूकंपामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवली आहेत.

भारताच्या शेजारी देशांमध्ये मोठा भूकंप, कोलकातामध्ये जोरदार धक्के, तब्बल 20 सेकंद जमीन..
Earthquake tremors
| Updated on: Nov 21, 2025 | 11:33 AM
Share

भारताच्या शेजारी देशांमध्ये मोठा भूकंप आला. बांगलादेशची राजधानी ढाका येथे तीव्र भूकंप झाला आहे. शुक्रवारी सकाळी ढाका आणि त्याच्या आसपासच्या भागात अचानक जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भारताच्या पश्चिम बंगालमध्येही काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तान आणि बांगलादेशात भूकंपाची तीव्रता अधिक आहे. कोलकातासह अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसले. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी बांगलादेशातील तुंगीपासून सुमारे 27 किलोमीटर पूर्वेला भूकंप झाला आणि बंगालपर्यंतही भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवली आहेत. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:38 वाजता भूकंपाची नोंद झाली. युरोपियन-भूमध्य भूकंप केंद्रानुसार, अनेक भागातून सौम्य भूकंपाच्या धक्क्यांचे वृत्त आले आहे.

सुमारे 20 सेकंद जमीन हादरत होती

या भूकंपाची तीव्रता 5.7 होती. हा भूकंप झाला आणि सुमारे 20 सेकंद जमीन हादरली. भूकंपामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि लोक घर सोडून बाहेर पळाली. काही तासांपूर्वी पाकिस्तानलाही भूकंपाचे धक्के बसले होते. शुक्रवारी पहाटे पाकिस्तानमध्ये 5.2 तीव्रतेचा भूकंपाची नोंद झाली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र पृष्ठभागापासून 135 किलोमीटर खाली आहे.

पाकिस्तान, अफगाणिस्तानात मोठा भूकंप 

खोलीवर येणारे भूकंप थेट पृष्ठभागावर परिणाम करत नाहीत आणि सामान्यतः कमी नुकसान करतात. पाकिस्तानमध्ये झालेल्या या भूकंपाचे धक्के अफगाणिस्तानच्या अनेक भागातही जाणवले. बंगालमधील मालदा, कूचबिहार, दक्षिण दिनाजपूर आणि हुगळी यासह अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्रिपुराच्या अनेक भागातही जाणवले. काही तासांच्या आतामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जाणवले आहेत. त्यामध्येच भारताच्या पश्चिम बंगालमध्ये धक्के जाणवले.

बांगलादेशातील भूकंपाचे धक्के भारतातही 

पाकिस्तानकडून सातत्याने अणु चाचण्या केल्या जात असल्याने भूकंपाचा इशारा काही दिवसांपूर्वीच देण्यात आला होता. पाकिस्तान पाठोपाठ आता बांगलादेशमध्येही भूकंप आल्याने चांगलीच मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. अफगाणिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला भूकंप पहाटे 1:59 वाजता झाला, ज्याचे केंद्रबिंदू सुमारे 190 किलोमीटर खोलीवर होते. दुसरा, अधिक तीव्र भूकंप पाकिस्तानमध्ये पहाटे 3:09 वाजता जाणवला.

Follow Us
नागपूरच्या प्रसिद्ध अशोका रेस्टॉरंटच्या सूपमध्ये मेलेलं झुरळ
धक्कादायक! नागपूरच्या प्रसिद्ध अशोका रेस्टॉरंटच्या सूपमध्ये मेलेलं झुरळ; FDA कडून थेट परवाना निलंबित!
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद;
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद; काय म्हणाले?
अखेर प्रकरण पेटलंच! जंतर-मंतरवर मोठा गोंधळ; परिस्थिती नियंत्रणात...
अखेर प्रकरण पेटलंच! जंतर-मंतरवर मोठा गोंधळ; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज अन्...
सोनम वांगचुक यांना सरकार घाबरलं; संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात!
Sanjay Raut Uncut | सोनम वांगचुक यांना सरकार घाबरलं; संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात!
संसदेतील पावसाळी अधिवेशनाआधीच शिंदे गटाची महत्त्वाची बैठकी; श्रीकांत..
संसदेतील पावसाळी अधिवेशनाआधीच शिंदे गटाची महत्त्वाची बैठकी; श्रीकांत शिंदेंसह खासदारही उपस्थित
मोठी घडामोड! सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्यास तयार; पण सरकारसमोर...
मोठी घडामोड! सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्यास तयार; पण सरकारसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
Girish Mahajan | गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल प्रकरणात मोठा खुलासा
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
Rajool Patil | वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!
विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीमार, जंतरमंतरवरचं आंदोलन पेटलं, मेट्रो स्टेशन बंद, इंटरनेट जॅम.

विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीमार, जंतरमंतरवरचं आंदोलन पेटलं, मेट्रो स्टेशन बंद, इंटरनेट जॅम

Parliament Monsoon Session 2026 : एका महिन्यात देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले, प्रत्येक भारतीयाला अभिमान, नरेंद्र मोदींचे मोठे विधान...

Parliament Monsoon Session 2026 : एका महिन्यात देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले, प्रत्येक भारतीयाला अभिमान, नरेंद्र मोदींचे मोठे विधान..

सरकार पोरांना घाबरलंय, 56 इंच वाल्यांची हातभर… संजय राऊत यांनी केंद्र सरकारला डिवचलं; ट्विटमध्ये ईडीचा उल्लेख.

सरकार पोरांना घाबरलंय, 56 इंच वाल्यांची हातभर… संजय राऊत यांनी केंद्र सरकारला डिवचलं; ट्विटमध्ये ईडीचा उल्लेख

IND vs ENG: कर्णधार गिलने ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानेच केला घात, लॉर्ड्स सामन्यात कोण ठरला व्हिलन?.

IND vs ENG: कर्णधार गिलने ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानेच केला घात, लॉर्ड्स सामन्यात कोण ठरला व्हिलन?

59 वर्षांपूर्वीच्या गाण्यात एक चूक, आजही प्रेक्षक ओळखू शकले नाहीत, लता मंगेशकर यांनी दिला आवाज.

59 वर्षांपूर्वीच्या गाण्यात एक चूक, आजही प्रेक्षक ओळखू शकले नाहीत, लता मंगेशकर यांनी दिला आवाज

सूपमध्ये सापडले झुरळ, फ्रिजमधील मांस पाहून थेट परवाना रद्द, तुकाराम मुंडे यांची मोठी कारवाई...

सूपमध्ये सापडले झुरळ, फ्रिजमधील मांस पाहून थेट परवाना रद्द, तुकाराम मुंडे यांची मोठी कारवाई..