कुलभूषण जाधव प्रकरण : भारताने तीन तासात पुराव्यांसह पाकिस्तानचा बुरखा फाडला

हेग : भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात (आयसीजे) सोमवारी सुनावणीला सुरुवात झाली. 18 ते 21 फेब्रुवारीपर्यंत भारत आणि पाकिस्तानचा युक्तीवाद ऐकला जाणार आहे. सोमवारची पहिल्या दिवसाची सुनावनी संपली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी अडीच वाजल्यापासून ते साडे पाच वाजेपर्यंत पाकिस्तानला युक्तीवाद करण्याची संधी मिळणार आहे. पहिल्या दिवशी भारताकडून ज्येष्ठ वकील […]

कुलभूषण जाधव प्रकरण : भारताने तीन तासात पुराव्यांसह पाकिस्तानचा बुरखा फाडला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

हेग : भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात (आयसीजे) सोमवारी सुनावणीला सुरुवात झाली. 18 ते 21 फेब्रुवारीपर्यंत भारत आणि पाकिस्तानचा युक्तीवाद ऐकला जाणार आहे. सोमवारची पहिल्या दिवसाची सुनावनी संपली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी अडीच वाजल्यापासून ते साडे पाच वाजेपर्यंत पाकिस्तानला युक्तीवाद करण्याची संधी मिळणार आहे. पहिल्या दिवशी भारताकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी तीन तास युक्तीवाद केला.

कुलभूषण जाधव यांच्यासाठी कौन्सिलर अॅक्सिस देण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी कशासाठी हवाय? असा सवाल करत हरीश साळवेंनी पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा फाडला. विना कौन्सिलर अॅक्सिस ही अटक बेकायदेशीर घोषित करण्यात यावी, अशी मागणी हरीश साळवेंनी केली, शिवाय विना विलंब कौन्सिलर अॅक्सिस देण्यात यावं, असंही ते म्हणाले.

दुसऱ्या टप्प्यातील भारताचा युक्तीवाद 20 फेब्रुवारीला होईल. या दिवशी सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत भारताला युक्तीवादासाठी वेळ दिला जाईल. तर पुढच्या दिवशी म्हणजे 21 फेब्रुवारीला रात्री नऊ वाजल्यापासून ते साडे दहा वाजेपर्यंत पाकिस्तानला युक्तीवादाची संधी दिली जाईल. 20 तारखेला भारत आयसीजेसमोर अंतिम तर्क मांडणार आहे, तर पाकिस्तानचा अंतिम तर्क 21 तारखेला मांडला जाईल. पाकिस्तानकडून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्यांच्या देशाचे अॅटर्नी जनरल अनवर मंसूर खान यांना पाठवण्यात आलंय.

पहिल्या दिवसाच्या सुनावणीत काय झालं?

पाकिस्तानने कौन्सिलर अॅक्सिस न देऊन व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप भारताने केलाय. तर कुलभूषण जाधव हे हेरगिरीच्या आरोपात अटक असल्यामुळे त्यांना अॅक्सेस दिला जाऊ शकत नसल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. भारतासोबत असलेल्या एका करारानुसार, हेरगिरीच्या आरोपात कौन्सिलर अॅक्सिस देण्याची तरतूद नसल्याचाही पाकिस्तानचा दावा आहे.

आयसीजेमध्ये पुढच्या चार दिवसात मुख्यतः दोन मुद्द्यांवर सुनावणी होईल. पहिलं म्हणजे, व्हिएन्ना कराराचं उल्लंघन, आणि दुसरं म्हणजे पाकिस्तानचं ही शिक्षा देण्याचं अधिकार क्षेत्र. दोन्ही देशांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आयसीजे अंतिम निर्णय देईल. 2016 पासून कोर्टात हे प्रकरण सुरु आहे. कुलभूषण यांना हेरगिरीच्या आरोपात 3 मार्च 2016 रोजी बलुचिस्तान प्रांतातून अटक केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे.

पाकिस्तानच्या कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या फाशीवर तूर्तास स्थगिती आणली. अंतिम सुनावणी होईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश पाकिस्तानला देण्यात आले होते.

हरीश साळवे कोर्टात काय म्हणाले?

हरीश साळवेंनी प्रत्येक घटना संबंधित तारखेसह कोर्टासमोर मांडली. भारताने 13 वेळा कौन्सिलर अॅक्सिसची मागणी केली, पण त्याला पाकिस्तानकडून प्रतिसाद मिळाल नाही हे सांगतानाच त्यांनी ज्या 13 वेळा भारताने पत्र पाठवलं त्याची तारीखही सांगितली. पाकिस्तानकडून गेल्या तीन वर्षांपासून कुलभूषण यांना टॉर्चर केलं जातंय, पण नेमकी अटक कोणत्या दिवशी झाली याचीही माहिती पाकिस्तानकडे नाही, असं हरीश साळवे म्हणाले.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.