Saifullah Khalid Shot Dead : मोठी बातमी! सैफुल्लाह खालीदची गोळ्या झाडून हत्या
Terrorist Saifullah Khalid : पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्लाह खालीदची हत्या झाली आहे. गोल्या मारून त्याची हत्या करण्यात आल आहे.

Terrorist Saifullah Khalid : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाद चालू आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून जम्मू-काश्मीर परिसरातील दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. असे असतानाच पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्लाह खालीदची हत्या झाली आहे. गोल्या मारून त्याची हत्या करण्यात आल आहे. सैफुल्लाह हा लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर होता. त्याला अज्ञातांनी गोळ्या घातल्याचे सांगितले जात आहे.
नेपाळमध्ये हाता सक्रीय
सैफुल्लाह याच्यावर पाकिस्तानच्या सिंध प्रांतात गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. सैफुल्लाह हा लष्कर ए तैयबा या संघटनेचे नेपाळमधील युनिट सांभाळायचा. लष्कर ए तैयबा या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी केडर उभे करणे तसेच आर्थिक मदत पुरवणे हे त्याचे प्रमुख काम होते. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तो नेपाळमध्ये सक्रिय होता.
भारतावरच्या तीन हल्ल्यांत होता समावेश
सैफुल्लाह या दहशतवाद्याचा भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमध्ये मोठा सहभाग होता. रामपूर येथे 2001 साली झालेला रपीएफ कँपवरील हल्ला, 2006 साली झालेल्या नागपुरातील संघाच्या मुख्यालयावरील हल्ला, तसेच 2005 साली झालेल्या बंगळुरू येथील इंडियन सायन्स काँग्रेस वर झालेल्या हल्ल्याचा यात सहभाग होता. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील बदीन जिल्ह्याच्या माटली तालुक्यात याला गोळ्या घालण्यात आल्या आहेत. सैफुल्लाह हा दहशतवाद्यांना नेपाळच्या मार्गे भारतात पाठवण्याचेही काम करायचा.
नाव बदलून महिलेशी केलं लग्न
सैफुल्लाह सध्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून त्याचे काम चालू होते. तो लष्कर ए तैयबासाठी नव्या दहशतवाद्यांची भरती जोमाने करत होता. तो नेपाळमद्ये विनोद कुमार या खोट्या नावासह राहात होता. विशेष म्हणजे या खोट्या नावासह त्याने नेपाळमधील एका महिलेशी लग्नही केलं होतं. नगमा बानू असे त्याने लग्न केलेल्या महिलेचे नाव आहे.
गोळ्या नेमक्या कोणी झाडल्या?
सैफुल्लाहची हत्या झाल्यानंतर त्याचा फटका लष्कर ए तैयबाला बसणार आहे. त्याच्यावर अज्ञाताने थेट गोळ्या झाडल्या आहेत. या गोळ्या नेमक्या कोणी घातल्या याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
