AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lebanon Walkie Talkie Blast : अंत्ययात्रेला आलेल्यांच्या वॉकी-टॉकीमध्ये स्फोट, अंगावर काटा आणणार खतरनाक VIDEO

Lebanon Walkie Talkie Blast : लेबनानमध्ये सध्या भयानक स्थिती आहे. पेजर ब्लास्टमध्ये मृत्यू झालेल्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप देण्यासाठी लोक जमा झाले होते. त्यावेळी अचानक वॉकी-टॉकीमध्ये स्फोट सुरु झाले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आलाय. लेबनानमध्ये सध्या दहशतीच वातावरण आहे. दोन दिवसात दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. त्यामुळे आज काय होणार? ही भिती, दहशत तिथल्या लोकांच्या मनात बसली आहे.

Lebanon Walkie Talkie Blast : अंत्ययात्रेला आलेल्यांच्या वॉकी-टॉकीमध्ये स्फोट, अंगावर काटा आणणार खतरनाक VIDEO
lebanon pager radio blast
| Updated on: Sep 19, 2024 | 10:22 AM
Share

मागचे दोन दिवस लेबनानसाठी खूपच धक्कादायक होते. तिथे बॉम्बस्फोटांची मालिका सुरु आहे. मंगळवारी 17 सप्टेंबरला हिज्बुल्लाह फायटर्सच्या पेजरमध्ये ब्लास्ट झाले. यात 9 जणांचा मृत्यू झाला, शेकडो जखमी झाले होते. बुधवारी अनेक ठिकाणी वॉकी-टॉकी ब्लास्ट झाला. पेजर ब्लास्टमध्ये मृत्यू झालेल्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप देण्यासाठी लोक जमलेले असताना हा वॉकी-टॉकी ब्लास्ट झाला. पेजर ब्लास्टमध्ये हिज्बुल्लाहचा खासदार अली अम्मार यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्याच्या अंत्ययात्रेसाठी गर्दी जमलेली असताना वॉकी-टॉकीमध्ये ब्लास्ट झाला. या स्फोटाचा अंगावर काटा आणणार व्हिडिओ व्हायरल झालाय.

अंत्ययात्रेसाठी मोठ्या संख्येने लोक जमा झाल्याच या व्हिडिओमध्ये दिसतय. लोक खासदाराच्या मुलाला शेवटचा निरोप देत होते. त्याचवेळी अचानक मोठा स्फोट झाला. सर्वत्र एकच गडबड, गोंधळ, पळापळ सुरु झाली. लोक आपला जीव वाचवण्यासाठी इथे-तिथे पळू लागले. या गॅजेट स्ट्राइकमुळे अनेक इमारती, दुकानं आणि गाड्यांमध्ये आग लागली. या स्फोटाचे अनेक व्हिडिओ समोर आलेत. लेबनानमध्ये जी भिती, दहशतीच वातावरण आहे, त्यातून स्पष्ट दिसतय. रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला आहे. सर्वत्र रुग्णवाहिकेचे सायरन ऐकू येत आहेत. काही व्हिडिओमध्ये गाड्या जळताना दिसतायत. काही ठिकाणी बिल्डिंगमध्ये आगीच्या ज्वाळा दिसत आहेत.

वॉकी टॉकी कधी विकत घेतलेले?

लेबनानमध्ये प्रचंड दहशत आहे. पेजरनंतर वॉकी-टॉकी, लॅपटॉप, फोन, सोलार पॅनल सिस्टिम, फिंगर प्रिंट रीडिंग मशीन आणि रेडियोमध्ये सीरियल ब्लास्ट सुरु आहेत. स्फोटांच्या या दुसऱ्या मालिकेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. 450 जखमी झाले आहेत. हिज्बुल्लाह कमांडरच्या हातात डिवाइस असताना बहुतेक स्फोट झाले. हिज्बुल्लाहने पेजरप्रमाणे ही उपकरण पाच महिन्यांपूर्वी विकत घेतली होती. पेजर आणि वॉकी टॉकी ब्लास्टमध्ये मिळून आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

उपचारासाठी एअरलिफ्ट

इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA नुसार, लेबनानमधून 95 जणांना उपचारासाठी इराणला पाठवण्यात आलं आहे. रेड क्रिसेंट सोसायटीचे प्रमुख पिरहोसिन कुलिवंद यांनी सांगितलं की, “या आठवड्यात लेबनानमध्ये झालेल्या डिवाइस स्फोटात जखमी झालेल्या 95 जणांना अधिक चांगल्या उपचारासाठी इराणला पाठवण्यात आलय” इराणी आउटलेट्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत लोकांना स्ट्रेचरवरुन विमानात नेण्याची दृश्य आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.