युद्ध भडकणार! व्लादिमीर पुतिन यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीवर बॉम्बहल्ला, रशियाला सर्वात मोठा धक्का..
व्लादिमीर पुतिन काही दिवसांपूर्वीच भारताच्या दाैऱ्यावर आले होते. युक्रेन आणि रशियातील तणाव चांगलाच वाढल्याचे सध्या बघायला मिळत आहे. त्यामध्येच युक्रेनने मोठी चाल खेळत थेट पुतिन यांनाच मोठा बॉम्ब हल्ला करत धक्का दिला आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसला आहे. मॉस्कोमधील व्लादिमीर पुतिन यांच्या सैन्याच्या ऑपरेशनल प्रशिक्षण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फॅनिल सरवारोव यांचा थेट कार बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. लेफ्टनंट जनरल फॅनिल सरवारोव यांच्या मृत्यूनंतर रशियात खळबळ उडाली. मिररच्या अहवालानुसार, मॉस्कोमधील व्लादिमीर पुतिन यांच्या सैन्याच्या ऑपरेशनल प्रशिक्षण विभागाचे प्रमुख फॅनिल सरवारोव यांचा मृत्यू झाला. हा हल्ला संशयास्पद झाला असून लेफ्टनंट जनरल फॅनिल सरवारोव यांनाच टार्गेट करू करण्यात आला. फॅनिल सरवारोव रशियन सशस्त्र दलांमध्ये एका अत्यंत महत्वाच्या पदावर कार्यरत होते. लष्कराच्या प्रशिक्षणाची आणि युद्धाअभ्यासाच्या तयारीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडेच होती. त्यांच्या मृत्यूने मोठा धक्का बसला. त्यामध्येच युक्रेनसोबत युद्ध सुरू असताना हे घडल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी फॅनिल सरवारोव एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये होते, त्यावेळी हा स्फोट झाला. या हल्ल्यामागे युक्रेनियन गुप्तचर संस्था असल्याचा थेट आरोप करण्यात आला. मात्र, या हल्ल्यावर अजून तरी युक्रेन सरकारने माैन बाळगले आहे. रशियाची सैन्य ताकद कमी करण्यासाठी आणि त्यांना व्यवस्थित युद्धाला सामोरे जाता येऊ नये, म्हणूनच हा हल्ला घडवून आणल्याचे बोलले जात आहे. मात्र, यामुळे रशियन गुप्तचर यंत्रणेवरही अनेक प्रश्न उपस्थित केली जात आहेत.
सैन्याच्या ऑपरेशनल प्रशिक्षण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फॅनिल सरवारोव हे पुतिन यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी एक असल्याचे सांगितले जाते. फॅनिल यांच्या निधनाने पुतिन यांना सर्वात मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. लेफ्टनंट जनरल त्यांच्या गाडीत असताना हा स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्यांना स्फोटामध्ये अनेक जखमा झाल्या. मुद्द्याम त्यांच्यावर बाळत ठेवूनच हा स्फोट करण्यात आल्याचे दिसत आहे.
राजधानीत वरिष्ठ रशियन अधिकाऱ्याला टार्गेट करून त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणेवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केली जात आहेत. आता पुतिन या हल्ल्याला कशाप्रकारे उत्तर देतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पुतिन या हल्ल्याचा आणि त्यांच्या जवळच्या सहकार्याच्या बदल कसा घेतात हे पाहण्यासारखे ठरेल.
