AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात श्रीमंतांची यादी जाहीर, इलॉन मस्क नंबर 1 वर, टॉप टेनमध्ये कोण-कोण ?

जगातील सर्वात श्रीमंताची यादी प्रसिद्ध झाली असून त्यात पहिल्या क्रमांकावर इलॉन मस्क यांचे नाव झळकत आहे. त्यांची संपत्ती एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचल्याचे म्हटले जात आहे. एक ट्रिलियन म्हणजे १०० अब्ज डॉलर...

जगातील सर्वात श्रीमंतांची यादी जाहीर, इलॉन मस्क नंबर 1 वर, टॉप टेनमध्ये कोण-कोण ?
elon musk networth
| Updated on: Jun 13, 2026 | 10:04 PM
Share

Top 10 Richest Person: जगातील सर्वात श्रीमंत लोकांची दौलत नेहमी शेअर बाजार, टेक कंपन्यांची कामगिरी आणि गुंतवणूकीनुसार बदलत असते. परंतू गेल्या काही वर्षांपासून इलॉन मस्क यांचे नाव संपत्तीच्या बाबतीत चर्चेत असते. इलॉन मस्क हे या स्पर्धेत कायम चर्चेत असते. तर जेफ बेजोस, मार्क झुकरबर्ग आणि अन्य टेक दिग्गज देखील अब्जावधी डॉलरच्या संपत्ती मुळे नेहमीच आघाडीवर असतात. मात्र. येत्या काही वर्षात ट्रिलियन डॉलर नेटवर्थचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘ट्रिलियन’ संपत्ती म्हणजे किती ?

भारतीय गणनेनुसार १ खरब रुपये आणि जागतिक वित्तीय प्रणालीत एक ट्रिलियन डॉलर याची संकल्पना वेगवेगळी आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीची संपत्ती १ ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहचते.तेव्हा त्याला जगातील पहिला ट्रिलेनियर म्हटले जाते. सध्या जगातील कोणताही व्यक्ती अधिकृतपणे १ ट्रिलियन डॉलर संपत्तीचा मालक झालेला नाही. मात्र, तज्ज्ञांच्या मते इलॉन मस्क यांना या उपलब्धीचा दावेदार मानले गेले आहे.

जगातील १० सर्वात श्रीमंत लोकांची यादी –

ताज्या जागतिक रँकिंगनुसार सर्वसाधारणे ही नावे प्रमुख श्रीमंतात सामील आहेत.

1. Elon Musk

2. Jeff Bezos

3. Mark Zuckerberg

4. Larry Ellison

5. Bernard Arnault

6. Warren Buffett

7. Larry Page

8. Sergey Brin

9. Steve Ballmer

10. Jensen Huang

( ही रँकिंग वेळोवेळी शेअर बाजार आणि संपत्तीच्या मुल्यांकनानुसार बदलत असते)

इलॉन मस्क संपत्ती वेगाने का वाढली ?

इलॉन मस्क यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा त्यांच्या कंपन्यातील हिस्सेदारीतून येतो. खास करुन टेस्ला आणि स्पेसएक्सच्या वाढत्या मुल्यांकनामुळे मस्क यांची नेटवर्थ नवी झेप घेत आहे. याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अंतराळ क्षेत्रात वाढत्या गुंतवणूकीमुळे देखील त्यांच्या कंपन्याचे मुल्य मजबूत झाले आहे.

टेक सेक्टरचा दबदबा

टॉप-10 श्रीमंताच्या यादीवर जर नजर टाकली तर बहुतांशी नावे टेक्नॉलॉजी उद्योगाशी संबंधित आहेत. ई-कॉमर्स, सोशल मीडिया, क्लाऊड कंम्प्युटिंग, चिप निर्मिती आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या उद्योगांना गेल्या एक दशकात सर्वात जास्त संपत्ती निर्माण केलेली आहे. याच कारणामुळे श्रीमंत लोकांच्या यादीत टेक उद्योजकांचा दबदबा सतत जास्त वाढत आहे.

Follow Us
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त