AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रेयस अय्यर याने मुंबईत घेतले आलिशान घर, किंमत ऐकूनच चाट पडाल…..

क्रिकेटस्टार श्रेयस अय्यर याने मुंबईतील सर्वात महागड्या भागात भाडेकरारावर आलिशान घर घेतले आहे. या घरासाठी त्याला कोट्यवधी रक्कम मोजावी लागली आहे.

श्रेयस अय्यर याने मुंबईत घेतले आलिशान घर, किंमत ऐकूनच चाट पडाल.....
Shreyas Iyer
| Updated on: Jun 12, 2026 | 7:19 PM
Share

भारतीय क्रिकेटर श्रेयर अय्यर याने मुंबईच्या वरळी येथे एक आलिशान अपोर्टमेंट भाड्याने घेतलेल आहे. या अपार्टमेंटचे एकूण भाडे तब्बल ७.१४ कोटी रुपये आहे. स्क्वायरयार्ड्स ( SquareYards ) द्वारा एक्सेस केले गेलेल्या प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन दस्ताऐवजाची माहिती समोर आली आहे. मुंबईतील वरळी हा परिसर भारतातील सर्वात महागड्या निवासी रिअल इस्टेट बाजारापैकी एक मानला जातो.

श्रेयस अय्यर याचे अपार्टमेंट वरळी येथील ‘आर्टेशिया’नावाच्या इमारतीत आहे. कागदपत्रानुसार या फ्लॅटचा एकूण एरिया सुमारे ३,८७५ चौरस फूट आहे आणि यासोबत चार कारची पार्किंग स्पेस देखील मिळाली आहे. हा करार १० जून २०२६ रोजी नोंदणीकृत झाला. या व्यवहारावर सुमारे १.८४ लाख रुपयांची स्टँम्प ड्युटी आणि १००० रुपयांचे रजिस्ट्रेशन शुल्क भरावे लागणार आहे.

या कराराचा कालावधी ३६ महिन्यांचा आहे. आणि यात पहिल्या वर्षाचे मासिक भाडे १८.५० लाख असेल, दुसऱ्या वर्षी सुमारे ७ टक्के वाढून भाडे १९.७९ लाख रुपये प्रति महिना होईल. यानंतर तिसऱ्या वर्षी हे ७ टक्के वाढून २१.१८ लाख प्रति महिना होईल. या हिशेबाने संपूर्ण लीज अवधीसाठी एकूण ७.१४ कोटी भाडे वसुल करण्यात येणार आहे.

श्रेयस याने काही काळ आधी खरेदी केली प्रॉपर्टी

काही काळ आधी श्रेयस अय्यरने मुंबईती वरळी विभागात २.९ कोटीची एक कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी केली होती. वरळी येथील लक्झरी टॉवर आणि सी-फेसिंग घरे आणि बीकेसी, नरीमन पॉईंट, लोअर परळ आणि फोर्टसारख्या प्रमुख बिझनेस भागामुळे आणि चांगल्या कनेक्टिव्हीटीसाठी मुंबईतील सर्वात पसंतीचा निवासी बाजारपेठ बनली आहे. या रिपोर्टमध्ये अलिकडेच एका सौद्याचा उल्लेख केलेला आहे. ज्यात गोदरेज ग्रुपच्या तान्या दुबाश हीने कथितपणे वरळी सीफेसवर सुमारे ३०० कोटी रुपयात एक सी-फेस अपार्टमेंट खरेदी केले आहे. याची किंमत २.५० लाख प्रति चौरस फूटहून जास्त आहे.

स्क्वायरयार्ड्सद्वारा सांगितलेल्या रिअल ईस्टेट तज्ज्ञानुसार वरळी सी फेसवरील प्रीमियम अपार्टमेंटची किंमत सर्वसाधारणपणे ८० हजार ते १ लाख प्रति चौरस फूट दरम्यान असते. तर सर्वात खास आणि एक्सक्लुसिव्ह घराची किंमत २.८० लाख प्रति चौरस फूट वा त्याहून अधिक जाऊ शकते.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार