AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahatma Gandhi | महात्मा गांधींच्या वस्तूंचा ब्रिटनमध्ये लिलाव, 2 कोटींपर्यंत बोली लागण्याची शक्यता

महात्मा गांधींनी वापरलेल्या वस्तूंचा लिलाव ब्रिटनमध्ये 10 जानेवारीला होणार आहे. ( Mahatma Gandhi used Cutlery Set Auction)

Mahatma Gandhi | महात्मा गांधींच्या वस्तूंचा ब्रिटनमध्ये लिलाव, 2 कोटींपर्यंत बोली लागण्याची शक्यता
महात्मा गांधी (फाईल फोटो)
| Updated on: Dec 30, 2020 | 2:16 PM
Share

लंडन : भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांनी वापरलेल्या एक वाटी ( Bowl) आणि चमचा (Cutlery set) याचा ब्रिटनमध्ये लिलाव होणार आहे. ब्रिटनच्या ब्रिस्टल शहरात 10 जानेवारीला या वस्तूंचा लिलाव होईल. या वस्तूंच्या सेटची एकत्रित किमंत 55 हजार ब्रिटीश पौंड ठेवण्यात आली आहे. लिलावाचे कमिशन, जीएसटी, विमा, भाडे आणि भारतीय कस्टम ड्युटी याचा विचार केल्यास भारतीय चलनात याची रक्कम 1 कोटी 20 लाखांवर जाते. (Mahatma Gandhi used Metal Bowl, Cutlery going under auction in Britain)

ग्लोबल ऑनलाईन संस्थेच्या अंदाजानुसार महात्मा गांधी यांनी वापरलेल्या वस्तूची बोली 80 हजार ब्रिटीश पौंडांपर्यंत जाऊ शकते. भारतीय चलनात याची किंमत 2 कोटींपर्यंत जाईल. काही वेळा लिलावासाठी ठरवण्यात आलेल्या किमान रकमेच्या दोन पट किंवा तीन पट बोली लावली जाऊ शकते.

महात्मा गांधी यांनी वापरलेल्या वस्तू, पत्र, पुस्तकं, फोटो, पेंटिंग, सँडल, चश्मे आणि इतर वस्तू इतिहासप्रेमी आणि ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करणाऱ्यांना आकर्षित करते. मात्र, महात्मा गांधींनी वापरलेल्या वस्तूचा लिलाव ही फारच दुर्मिळ घटना आहे. महात्मा गांधींनी वापरलेला कटलरी सेट त्यांचे अनुयायी सुमति मोरारजी यांच्या संग्रहात होता.

ईस्ट ब्रिस्टल संस्था लिलाव करणार

ईस्ट ब्रिस्टल या लिलाव करणाऱ्या संस्थेकडून या कटलरी सेट बद्दल अधिकृत माहिती देण्यात आली आहे. महात्मा गांधींनी पुण्यातील आगा खान पॅलेसमध्ये 1942 ते 1944 आणि मुंबईतील बाम बन हाऊसमध्ये या कटलरी सेटचा वापर केला होता. या सेटमधील वाटी  मेटलपासून बनवण्यात आलेली आहे. त्याच्यावर 208/ 42 असं कोरण्यात आलं आहे. दोन लाकडी चमचे असून त्यावर नक्षीकाम देखील करण्यात आलेले आहे.

लिलाव करणाऱ्या संस्थेचे ट्विट

महात्मा गांधी हा कटलरी सेट वापरत होते. समुति मोरारजी या त्यांच्या अनुयायानं हा सेट साभांळून ठेवला होता. सुमती मोरारजी महात्मा गांधी दीर्घकाळ महात्मा गांधी सोबत होते. यावस्तूंचा मोराराजी यांनी त्यांच्या पुस्तकात उल्लेख केला आहे. लिलाव करणाऱ्या संस्थेने हा सेट महात्मा गांधीचं नाहीतर भारताच्या इतिहासातील महत्वाच्या वस्तू असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ईस्ट ब्रिस्टल संस्थेला महात्मा गांधी यांचा चष्मा दक्षिण आफ्रिकेतील एका व्यक्तीकडून मिळाला होता. ऑगस्टमध्ये त्या चष्मांचा लिलाव 2.5 कोटी रुपयांना झाला होता.

संबंधित बातम्या:

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, महात्मा गांधी-किंग कायद्याला मंजुरी, भारताला काय मिळणार?

गांधींजींचा देशातील सर्वात उंच पुतळा महाराष्ट्रात, 35 टन भंगार वापरुन निर्मिती

(Mahatma Gandhi used Metal Bowl, Cutlery going under auction in Britain)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.