AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Blast in Pakistan : पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याने हादरला, नमाज पठण सुरु असताना मशि‍दीत शक्तीशाली स्फोट

Blast in Pakistan : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाहा प्रांतात एक मोठा स्फोट झाला आहे. पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्याची ही पहिली घटना नाहीय. यापूर्वी सुद्धा पाकिस्तानात अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले झाले आहेत.

Blast in Pakistan : पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याने हादरला, नमाज पठण सुरु असताना मशि‍दीत शक्तीशाली स्फोट
Pakistan Blast
| Updated on: Sep 18, 2026 | 3:34 PM
Share

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाहा प्रांतात एक मोठा स्फोट झाला आहे. खैबर पख्तूनख्वाहच्या पेशावरमध्ये हा स्फोट झाला आहे. नमाज अदा करताना एका मशि‍दीमध्ये हा बॉम्बस्फोट झाला. कोहाट येथे ओल्ड पोलीस लाइनजवळ एक मशीद आहे, तिथे हा ब्लास्ट झाला. स्फोटानंतर हल्लेखोरांनी अंदाधुंद फायरिंग केली. सूत्रांच्या माहितीनुसार मशिदीत झालेल्या या स्फोटात आतापर्यंत 25 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कोहाट येथे ओल्ड पोलीस लाइनजवळ एक मशिदीत हा बॉम्बस्फोट झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे असं खैबर पख्तूनख्वाचे इंस्पेक्टर जनरल (IG) जुल्फिकार हमीद यांनी सांगितलं. प्राथमिक माहितीनुसार, स्फोटकं भरलेली एक गाडी ओल्ड पोलीस लाइनमध्ये घुसवण्यात आली. हा स्फोट कसा झाला, यामागे कोण आहे, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. रेस्क्यू 1122 चे प्रवक्ते बिलाल अहमद फैजी यांनी सांगितलं की, स्फोटाची सूचना मिळताच टीम लगेच घटनास्थळी पोहोचली. रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं आहे.

तेहरीक ए तालिबान आणि बलूच बंडखोरांशी लढाई

पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्याची ही पहिली घटना नाहीय. यापूर्वी सुद्धा पाकिस्तानात अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यात अनेक निरपराध नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. पाकिस्तानी सैन्याची सध्या तेहरीक ए तालिबान आणि बलूच बंडखोरांशी लढाई सुरु आहे. याआधी सुद्धा या दोन संघटनांनी पाकिस्तानात अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. पाकिस्तानने जो दहशतवादाचा राक्षस उभा केला. आता तो त्यांच्यावरच उलटला आहे. पाकिस्तानी सैनिक दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडतायत.

Follow Us
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग