
Jaish-e-Mohammed chief Masood Azhar : पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर पुन्हा त्याच्या कुरापतींमुळे चर्चेत आला आहे. पाकिस्तान येथे लपलेले दशतवादी जोपर्यंत जिवंत आहेत, तोपर्यंत ऑपरेश सिंदूरचं दुःख विसरता येणार नाही… पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान येथील दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त केली. यामध्ये मसूद अजहर याच्या कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला. अशात खुद्द मसूद अजहर याने देखील स्वतःची मृत्यूची भीक मागितली… दरम्यान, मसूद अजहर याची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ज्यामध्ये म्होरक्या नवीन कट रचत असल्याचं समोर आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, मसूद अझहरची दहशतवादी संघटना, जैश-ए-मोहम्मद, उघडपणे पाकिस्तानमध्ये एक नवीन मोहीम चालवत आहे, ज्यामध्ये ते जमात-उल-मोमिनत नावाची महिला जिहाद शाखा तयार करत आहे. यामध्ये आत्मघातकी दशहतवाद्यांचं भारताविरोधात ब्रेनवॉश करण्यात येत आहे. या ट्रेनिंग दरम्यान, अझहर याने आत्मघातकी दशहतवाद्यांना एक ऑडिओ मेसेज देखील पाठवला आहे. 21 मिनिटांच्या क्लिपमध्ये अझहर महिलांचं ब्रेनवॉश करताना दिसत आहे… ‘मृत्यूनंतर, तुम्ही तुमच्या कबरीतून थेट स्वर्गात जाल…’ असं अझहर म्हणत आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये, मसूदने ब्रेनवॉशिंग तंत्र म्हणून हिंदू महिलांबद्दल खोटे बोलण्याचा वापर केला आहे. ‘जैशच्या शत्रूंनी हिंदू महिलांना सेनेत भर्ती केलं आहे आणि महिला पत्रकरांना आपल्या विरोधात भडकवलं आहे. आपल्या विरोधात उभं केलं आहे… ‘ क्लिपमध्ये त्याने हिंदू महिलांशी लढण्यासाठी आत्मघातकी दशहतवाद्यांना शपथही दिली आहे.
असं सांगितलं जात आहे की, मसूदने पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यात जमात-उल-मोमिनतच्या शाखा उघडण्याची घोषणाही केली आहे. आतापर्यंत या दशहतवादी ट्रेनिंगमध्ये पाकिस्तानच्या कोपऱ्या-कोपऱ्यातून सामान्य महिलांना भर्ती केलं जात आहे. दशहतवादी कारवायांमध्ये आता दहशतवाद्यांच्या विधवा देखील सामिर होणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. शिवाय महिला शाखा मॅनेज करतील… अशी माहिती देखील समोर येत आहे.
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याने सांगितल्यानुसार, आत्मघातकी हल्लेखोरांना देखील पुरुषांप्रमाणे ट्रेनिंग दिली जाईल.. जैश-ए-मोहम्मदचा पुरुष मुजाहिदीन नवीन महिला युनिटसोबत जवळून काम करेल. पण, महिला सदस्यांना फोन किंवा मेसेजिंग अॅप्सद्वारे त्यांचे पती आणि मुलांव्यतिरिक्त इतर पुरुषांशी संवाद साधण्यास मनाई करण्यात आली आहे.