AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियावर भीषण हल्ला! प्रचंड नुकसान, एका भारतीयासह तिघांचा मृत्यू; संपूर्ण जग हादरलं

Moscow Drone Attack : रशियाची राजधानी मॉस्कोवर रविवारी युक्रेनकडून भीषण हल्ला करण्यात आला आहे. या ड्रोन हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रशियावर भीषण हल्ला! प्रचंड नुकसान, एका भारतीयासह तिघांचा मृत्यू; संपूर्ण जग हादरलं
Moscow drone attackImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 17, 2026 | 9:52 PM
Share

गेल्या 4 पेक्षा जास्त वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. रशियाची राजधानी मॉस्कोवर रविवारी युक्रेनकडून भीषण हल्ला करण्यात आला आहे. या ड्रोन हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर अन्य तीन भारतीय कर्मचारी जखमी झाले आहेत. भारतीय दुतावासाने याबाबत माहिती दिली असून मृत भारतीय नागरिकाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून मदतकार्य सुरू असल्याचेही सांगितले आहे.

भारतीय दूतावासाने X वर दिली माहिती

भारतीय दूतावासाने रविवारी X वर पोस्ट एक पोस्ट करत या घटनेची माहिती दिली. दूतावासाने म्हटले, ‘आज मॉस्को परिसरात झालेल्या ड्रोन हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य तीन भारतीय जखमी झाले आहेत. दूतावासाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी रुग्णालयात जखमी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. या भीषण ड्रोन हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. कंपनी व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनासोबत मिळून या घटनेतील पीडिच कर्मचाऱ्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत आहोत.”

ड्रोन हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू, 12 जखमी

रशियन अधिकाऱ्यांनी या हल्ल्याबाबत दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनकडून करण्यात आलेल्या या ड्रोन हल्ल्यात किमान तीन जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांच्या मते रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने मध्यरात्री मॉस्कोकडे येणारे 81 ड्रोन हवेतच नष्ट केले. तसेच 24 तासांत 120 हून अधिक ड्रोन पाडण्यात आले आहेत. सोब्यानिन यांनी हा हल्ला युक्रेनकडून गेल्या एका वर्षात करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या ड्रोन हल्ल्यांपैकी एक असल्याचे म्हटले आहे.

सर्गेई सोब्यानिन यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘या ड्रोन हल्ल्यांमुळे मॉस्कोतील तेल शुद्धीकरण तंत्रज्ञानावर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र परिसरातील तीन घरांचे नुकसान झाले आहे.’ रशियन संरक्षण मंत्रालयने सांगितले की, ‘मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत मॉस्को प्रदेशासह संपूर्ण देशभरात गेल्या 24 तासांत एकूण 556 ड्रोन पाडण्यात आले आहेत.’ दरम्यान, आता या हल्ल्यानंतर रशिया काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...