AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel War : जगावर घोंगावणार आर्थिक संकट? इराणच्या मनमानी निर्णयामुळे मोठा फटका, होमुर्झची सामुद्रधुनी..

जर इराणने 48 तासांच्या आत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा उघडली नाही, तर इराणचे वीज प्रकल्प पूर्णपणे नष्ट केले जातील असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रविवारी दिला होता. मात्र त्यानंतर आता इराणने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Iran Israel War : जगावर घोंगावणार आर्थिक संकट? इराणच्या मनमानी निर्णयामुळे मोठा फटका, होमुर्झची सामुद्रधुनी..
Strait of hormuzImage Credit source: Getty Images
| Updated on: Mar 23, 2026 | 12:35 PM
Share

गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल – अमेरिका (Iran Israel War) युद्धामुळे सगळं जग संकटात सापडं आहे. हे युद्ध थांबण्याची सध्या कोणतीही शक्यता दिसत नाहीये. इस्रायलने अमेरिकेसोबत इराणवर केलेला हल्ला, त्याला इराणकडून मिळालेलं प्रत्युत्तर यामुळे तणाव तर वाढला आहेच पण मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झालेली दिसत्ये. एवढंच नव्हे तर होमुर्झची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद करत अमेरिकेवर दबाव वाढवण्याचा , इराणचा निर्णय जगासाठीही हादरवणारा ठरला आहे. त्यामुळे मोठी इंधनटंचाई हन करावी लागत आहे. नैसर्गिक वायू, कच्च्या तेलाचा वैश्विक पुरवठ्याच्या तुलनेत एकूण 20 टक्के पुरवठा याच सामुद्रधुनीतून होतो. त्यामुळे भारतासह अनेक देशांवर उर्जासंकट निर्माण झालं आणि तणाव आणखी वाढला.

होर्मुझ समुद्रधुनीचा हा मार्ग लवकरात लवकर खुला करणयासाठी अमेरिकेकडून दबाव टाकला जात असतानाच आता इराणने एक मोठा, धक्कादायक निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत युद्ध पुकारलेला इराण आता, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांकडून खंडणी वसूल करत आहे. काही जहाजांकडून या मार्गासाठी लाखो डॉलर्स आकारले जात असल्याचे वृत्त समोर आलं आहे. एका इराणी खासदारानेच हा दावा केला आहे. अमेरिकेने हल्ले केल्यास होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याची धमकी इराणने यापूर्वी दिली होती.

इराण इंटरनॅशनलच्या सांगण्यानुसार, इराणी संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सदस्य अलाएद्दीन ब्रुजेर्दी यांनी सांगितले की, हा उपाय आधीच लागू करण्यात आला आहे. ” युद्धाची एक किंमत असते, त्यामुळे साहजिकच आपण हे केले पाहिजे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून ट्रांझिट शुल्क आकारले पाहिजे,” असं ते म्हणाल्याचं वृत्त आहे. याआधी इराणने वेगळीच भूमिका घेतली होती. इराणचे शत्रू वगळता इतर सर्व देशांची जहाजे आम्ही या मार्गाने जाऊ देऊ, असं इराणचे प्रतिनिधी अली मौसावी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेपुढे (आयएमओ) सांगितलं होतं, मात्र आता त्यांनी ट्रांझिट शुल्क आकारल्यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतो.

जर 48 तासांच्या आत समुद्रधुनीचा मार्ग खुला केला नाही, तर अमेरिका इराणच्या वीज आणि ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करू शकते या डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याचाही ब्रुजेर्दी यांनी उल्लेख केला. इस्रायलच्या ऊर्जा पायाभूत सुविधादेखील इराणच्या टप्प्यात आहेत आणि त्या “एका दिवसात” पूर्णपणे नष्ट केल्या जाऊ शकतात असं चोख प्रत्युत्तर ब्रूजेर्दी यांनी दिलं.

अमेरिका अलर्ट

डोनाल्ड ट्रम्प हे इराणबाबतच्या आपल्या ‘रेड लाईन्स’वर ठाम आहेत, असं संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेचे राजदूत माईक वॉल्ट्झ यांनी रविवारी सांगितलं. इराणला जगाचा ऊर्जा पुरवठा ओलीस ठेवू देणार नाहीत असंही ते पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीवर लादलेल्या नाकेबंदीचा संदर्भ देत म्हणाले.

48 तासांत उघडा समुद्रधुनीचा मार्ग नाहीतर

इराणने 48 तासांच्या आता होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास आम्ही त्यांच्या वीजनिर्मिती केंद्रांवर हल्ले करू, असा रोखठोक इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता.याआधी त्यांनी युद्ध संपवणयाचा विचार बोलून दाखवला होता, मात्र रविवारी त्या याच्या बरोब्बर उलट विधान केल्याने खळबळ माजली होती.

बंद करू मार्ग 

मात्र ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर इराणने आक्रमक भूमिका घेतली. जर ट्रम्प यांनी देशातील वीज प्रकल्पांना लक्ष्य केले, तर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली जाईल, असा इशारा इराणच्या लष्कराने दिला होता. “जर इराणच्या वीज प्रकल्पांसंदर्भातील धमक्यांची अंमलबजावणी अमेरिकेने केली, तर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली जाईल आणि आमचे उद्ध्वस्त झालेले वीज प्रकल्प पुन्हा बांधले जाईपर्यंत ती उघडली जाणार नाही,” असे लष्कराच्या ऑपरेशनल कमांड, खतम अल-अंबियाने, सरकारी टीव्हीवरून प्रसारित केलेल्या एका निवेदनात म्हटलं होतं. एकदंरच युद्धातील तणाव वाढत असून कोणीच माघार घेताना दिसत नाहीये. यापुढे काय होतं, याकडे अवघ्या जगाचं लक्ष एकवटलं आहे.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक