
इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज आठवा दिवस आहे. दिवसेंदिवस हे युद्ध भीषण होत चाललं आहे. इस्रायल आणि इराण परस्परांवर जोरदार हल्ला करत आहे. इराण इस्रायलमधील नागरीक वस्त्यांना लक्ष्य करत आहे. त्याचवेळी इस्रायल इराणचे सैनिक तळ, अणूऊर्जा प्रकल्प, मिसाइल कारखान्यांवर हल्ले करत आहे. इराणकडून युद्धाचे काही नियम मोडले जात आहेत. त्यांनी आज क्लस्टर बॉम्बने इस्रायलवर हल्ला केला. इस्रायलकडून इराणमधील अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ले सुरु आहेत. पण इराणच्या बुशहर अणूऊर्जा प्रकल्पावर इस्रायलने हल्ला केलेला नाही. बुशहर येथे रशियाने बांधलेला अणूऊर्जा प्रकल्प आहे. तिथे रशियाचे 600 कर्मचारी काम करतात.
गुरुवारी इस्रायलकडून बुशहर अणूऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्याचा वक्तव्य करण्यात आलं होतं. पण नंतर मात्र, या ठिकाणी हल्ला केल्याच इस्रायलने फेटाळलं. चुकून कमेंट करण्यात आली, असं इस्रायलकडून सांगण्यात आलं. बुशहर अणूऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य आणि नियंत्रणात आहे, असं रशियाचे अणूऊर्जा प्रमुख एलेक्सी लिखाचेव यांनी सांगितलं.
इथे हल्ला झाला, तर चर्नोबिल सारखं संकट
रशियन अणूऊर्जा विभाग रोसाटॉमचे प्रमुख लिखाचेव म्हणाले की, “इस्रायलने बुशहर अणूऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला, तर चर्नोबिलसारख रेडिएशनच संकट निर्माण होईल” पूर्वीच्या सोवियत युनियनमध्ये चर्नोबिल किरणोत्सारानंतर ते अख्ख शहर रिकामं करावं लागलं होतं. तो एका मोठा औद्योगिक अणूऊर्जा अपघात होता. बुशहर हे इराणमधलं एकमेव चालू असलेलं अणूऊर्जा सयंत्र आहे. रशियन इंधनावर ही अणूभट्टी चालते.
पुतिन यांना दिलाय शब्द
बुशहरमध्ये 600 कर्मचारी आहेत. यात 250 स्थायी आणि अन्य अस्थायी नियुक्तीवर आहेत. इस्रायलने रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच आश्वासन दिलं आहे. लिखाचेव म्हणाले की, “काही कर्मचाऱ्यांना तिथून काढण्यात आलं आहे. पण मुख्य कर्मचाही अजूनही तिथे आहेत”
युरेनियम संवर्धन वाढवतोय
इराण आणि इस्रायलमधील चालू लढाईचा मुद्दा अणूबॉम्ब आहे. इस्रायलला इराणला अणूबॉम्ब बनवण्यापासून रोखायचं आहे, म्हणून ते इराणवर हल्ला करतायत. इराण सतत युरेनियम संवर्धन वाढवतोय, असं इस्रायलच म्हणणं आहे. जास्त प्रमाणत युरेनियम संवर्धन केल्यास ते सहज अणूबॉम्ब बनवू शकतात.