AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्ही युद्धासारख्या परिस्थितीत…’, बांगलादेशातील निवडणुका मोहम्मद युनूस यांनी पुन्हा टाळल्या

बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी आपला कार्यकाळ पुन्हा वाढवला आहे. त्यांनी आता म्हटले की, देशात कठीण परिस्थिता आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये निवडणुका होणार नाही. पुढील वर्षी ३० जूननंतर मी एक दिवससुद्धा पदावर थांबणार नाही.

'आम्ही युद्धासारख्या परिस्थितीत...', बांगलादेशातील निवडणुका मोहम्मद युनूस यांनी पुन्हा टाळल्या
मोहम्मद युनूसImage Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: May 26, 2025 | 10:04 AM
Share

बांगलादेशमधील परिस्थिती कठीण झाली आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलन सुरु आहे. नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून अनेक शहरांमध्ये आंदोलन केले जात आहे. ढाका शहरात भयग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कधीही काहीही होऊ शकते, अशी भीती लोकांना आहे. शिक्षकांनी आजपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, परिस्थिती खराब असल्याचे कारण देत पुन्हा एकदा मोहम्मद युनूस यांनी निवडणुका टाळल्या आहेत. त्यांनी आपला कार्यकाळ एक वर्ष वाढवून घेतला आहे.

बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी निवडणुका पुन्हा सहा महिने पुढे ढकलल्या आहेत. आतापर्यंत डिसेंबर २०२५ पर्यंत निवडणुका घेण्यात येणार असल्याचे ते सांगत होते. परंतु आता पुढील वर्षी जून महिन्यापर्यंत निवडणुका घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते ३० जूनपर्यंत पदावर कायम राहणार आहे. देशात युद्धासारखी परिस्थिती आहे, असे सांगत युनूस यांनी निवडणुका टाळल्या आहेत. दुसरीकडे बांगलादेशातील राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी डिसेंबरपर्यंत निवडणुका घेण्याची मागणी रेटून धरली आहे. त्यासाठी बांगलादेशात उग्र आंदोलन सुरु आहे.

व्यापारी संघटना काय म्हणते…

व्यापारी संघटनेचे प्रमुख शौकत अजीज रसेल यांनी म्हटले की, युनूस सरकारने व्यापाऱ्यांवर १९७१ मधील परिस्थिती पुन्हा आणली आहे. त्या काळात मुक्ती संग्राममधील बुद्धिजीवी लोकांनी व्यापाऱ्यांवर कठीण परिस्थिती आणली होती. सध्या दुष्काळसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. बेरोजगारी वाढत आहे. बांगलादेश टेक्सटाइल्स मिल्स असोसिएशनचे (बीटीएमए) अध्यक्ष रसेल यांनी सांगितले की, आम्ही ईद-उल-अजहापूर्वी कामगारांना पगार आणि बोनस देऊ शकतो की नाही, हे सांगता येत नाही. सरकार गुंतवणूकदरांना आमंत्रित करत आहे. पण गुंतवणूकदारांना देशातील परिस्थिती माहिती आहे. गुंतवणूकदार बांगलादेशात येणार नाही.

दरम्यान, मोहम्मद युनूस यांनी आपला कार्यकाळ वाढवताना म्हटले की, पुढील वर्षी ३० जूननंतर एक दिवससुद्धा पदावर थांबणार नाही. रविवारी सर्व राजकीय पक्षांसोबत युनूस यांनी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. त्यानंतर युनूस यांचे माध्यम सल्लागार शफीकुल आलम यांनी माध्यमांना त्या बैठकीतील माहिती दिली.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.