WHO Warning: मंकीपॉक्सबद्दल WHO कडून धोक्याचा इशारा; 12 देशात सापडले 92 रुग्ण; शरीरसंबंधातून होतोय रोगाचा प्रसार

डब्ल्यूएचओचे अधिकारी डेव्हिड हेमन यांच्याकडून सांगण्यात आले की, मंकीपॉक्स हा सेक्सद्वारे मानवांमध्ये अधिक पसरत आहे आणि त्यामुळे जगभरात त्याची प्रकरणे वाढत आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, दक्षिण आफ्रिकन देशांमध्ये दरवर्षी हजारो लोकांना मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आतापर्यंत सिद्ध झाले आहे.

WHO Warning: मंकीपॉक्सबद्दल WHO कडून धोक्याचा इशारा; 12 देशात सापडले  92 रुग्ण; शरीरसंबंधातून होतोय रोगाचा प्रसार
मंकीपॉक्सचा लहान मुलांना धोका
महादेव कांबळे

|

May 23, 2022 | 6:24 PM

मुंबईः  कोरोना महामारीचा काळ सुरु असतानाच जगभरात आता मंकीपॉक्स (Monkeypox) आजाराची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. भारतात आतापर्यंत एकही केस नोंदवण्यात आली नसली तरी त्याबाबत जागरुकता ठेवण्यात आली आहे. मंकीपॉक्स म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहेत आणि त्यावर उपचार कसे केले जातात, तसेच भारतात या विषाणूचा धोका आहे का? याबद्दलच आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. कोरोनानंतर (Corona) आता जगात एक नवीन आजार प्रचंड वेगाने पसरत आहे, त्याचे नाव आहे, ‘मंकीपॉक्स’. एका अहवालानुसार, आतापर्यंत जगभरात मंकीपॉक्सचे 92 रुग्ण आढळले असून ही सर्व प्रकरणे यूके, युरोपियन देश, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह 12 देशात आढळून आले आहेत.

थेट संपर्कातून प्रसार वाढतोय

जागतिक आरोग्य संस्था (World Health Organization) (WHO) कडूनही मंकीपॉक्सविषयी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, ज्या देशात हा रोग अजून पसरलेला नाही, त्या देशात मंकीपॉक्सची अधिक प्रकरणे नोंद होण्याची शक्यता आहे. जे लोक थेट संपर्कात येत असतात अशा लोकांमध्येच मंकीपॉक्सचा प्रसार होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सेक्सद्वारे मानवांमध्ये पसरला

डब्ल्यूएचओचे अधिकारी डेव्हिड हेमन यांच्याकडून सांगण्यात आले की, मंकीपॉक्स हा सेक्सद्वारे मानवांमध्ये अधिक पसरत आहे आणि त्यामुळे जगभरात त्याची प्रकरणे वाढत आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, दक्षिण आफ्रिकन देशांमध्ये दरवर्षी हजारो लोकांना मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आतापर्यंत सिद्ध झाले आहे.

भारतात पसरण्याची शक्यता

जगातील 12 देशात हा रोग पसरल्यानंतर भारतात पसरण्याची शक्यता किती? यामुळे आणखी एक साथीचा रोग होऊ शकतो का? याबद्दलही तज्ञांचे काय म्हणणे आहे ते देखील जाणून घ्या.

प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारा रोग

चेंबूर येथील जैन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील कन्सल्टिंग फिजिशियन आणि इन्फेक्शन स्पेशालिस्ट डॉ. विक्रांत शहा यांच्या मते, मंकीपॉक्स हा रोग प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारा एक झुनोसिस रोग आहे. मंकीपॉक्स हा ऑर्थोपॉक्स विषाणू आहे. मंकीपॉक्स विषाणू हा पॉक्सविरिडे कुटुंबातील ऑर्थोपॉक्स विषाणू वंशातील असून तो 1958 मध्ये, माकडांमध्ये दोन चेचकसारखे आजार आढळून आले होते, त्यापैकीच एक मंकीपॉक्स हा विषाणू होता.

मंकीपॉक्सचा प्रसार कसा होतो

हिंदुजा हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर खार येथील अंतर्गत औषध सल्लागार डॉ. राजेश जरिया यांच्या मते, या विषाणूचे सर्वात लहान कण आहेत. कधीकधी भौतिक घटक हे विषाणू थांबवू शकत नाहीत आणि ते एका जीवातून दुसऱ्या जीवात सहज पणे जाऊ शकतात. मंकीपॉक्स हा विषाणू ज्याला लागण झालेली आहे त्याला किंवा संक्रमित मानवांच्या संपर्कातून पसरतो. आणि म्हणूनच तो इतक्या वेगाने पसरत असल्याचे सांगण्यात येत आहे. या विषाणूचा प्रसार होण्याचा अंदाज 3.3 ते 30 टक्के आहे. या विषाणूचा सगळ्यात जास्त प्रसार हा काँगोमध्ये झाला असून त्याचे प्रमाण 73 टक्के होते.

त्वचेच्या संपर्काद्वारे विषाणूचा संसर्ग

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनचे संसर्गजन्य रोग विशेषज्ञ प्रोफेसर जिमी व्हिटवर्थ यांनी सांगितले की, मंकीपॉक्सचा हा प्रकार कोणत्याही नवीन मार्गाने पसरत आहे यावर संशोधन चालू आहे. मंकीपॉक्स सामान्यतः एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो. त्याचा प्रसार होताना दुसर्‍या व्यक्तीचा जवळचा संपर्क,अंथरूण,कपड्यांद्वारे त्याचा प्रसार होतो.मात्र त्वचेपासून त्वचेच्या संपर्काद्वारे या विषाणूचा संसर्ग पसरत जाण्याचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. हा विषाणू शारीरिक संबंध ठेवल्याने त्याचा प्रसार वेगाने पसतो.

मंकीपॉक्सची लक्षणे

मंकीपॉक्स चिकनपॉक्सपेक्षा सौम्य असली तरी त्याची लक्षणे ताप, डोकेदुखी, शरीरावर पुरळ आणि फ्लूसारखी लक्षणे आहेत. ही लक्षणे 3 आठवड्यांच्या आत स्वतःहून निघून जातात. याशिवाय, मंकीपॉक्स शरीरातील लिम्फ नोड्स किंवा ग्रंथीचे प्रमाणदेखील वाढवू शकते. मंकीपॉक्सच्या संपर्कात आलेल्या बहुतेकांना फक्त ताप, अंगदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा जाणवल्यासारखा वाटतो. संसर्ग अधिक गंभीर असल्यास, चेहऱ्यावर आणि हातावर पुरळ आणि फोड येऊ शकतात, जे हळूहळू शरीराच्या इतर भागातही पसरू शकतात.

मंकीपॉक्सवर उपचार काय आहेत?

विषाणूच्या संपर्कात आलेल्या लोकांना बर्‍याचदा चेचकच्या काही लसी दिल्या जातात, कारण त्या मंकीपॉक्सविरूद्ध प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय शास्त्रज्ञ अँटीव्हायरल औषधे बनवण्याच्या कामात ते आता गुंतून गेले आहेत. युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल सर्व संशयित रुग्णांना वेगळे ठेवण्याची आणि उच्च धोका असलेल्यांना चेचक लसीकरण करण्याचा उपाय त्यांनी सुचवला आहे.

भारताला मंकीपॉक्सचा धोका?

एड्स सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. ईश्वर गिलाडा यांच्या मतानुसार हा विषाणू साधारणपणे प्राण्यांमधूनच त्याचा जास्त पसरतो पण नंतर तो प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. मंकीपॉक्स हा एचआयव्हीसारखा झुनोटिक आहे. तो विषाणूच्या रूपात आला असल्याने त्याला सिमियन म्हणतात. इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस असल्याने विषाणू प्राण्यांमध्ये पसरतात, पण माणसापर्यंत पोहोचतात. हा विषाणू साथीचा रोग बनण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें