आईने आपल्याच 10 महिन्यांच्या बाळाला टोचली तब्बल 600 वेळा सुई, हादरवणारं कारण, डॉक्टरांचाही उडाला थरकाप

एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, आईनेच आपल्या बाळाला तब्बल 600 वेळा सुई टोचल्याचा भयंकर प्रकार घडला आहे, या बाळाची अवस्था पाहून डॉक्टरांनाही प्रचंड धक्का बसला, हादरवणारं कारण समोर आलं आहे.

आईने आपल्याच 10 महिन्यांच्या बाळाला टोचली तब्बल 600 वेळा सुई, हादरवणारं कारण, डॉक्टरांचाही उडाला थरकाप
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 30, 2026 | 10:11 PM

एक धक्कादायक घटना समोर आली आहे, आईनेच आपल्या बाळाला एक नाही दोन नाही तर तब्बल 600 वेळा सुई टोचल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, युजर्स या निर्दयी आईवर प्रचंड टीका करत आहेत, ही या मुलाची आई असूच शकत नाही, असं देखील काही युजर्सने म्हटलं आहे. या मुलाची अवस्था पाहून डॉक्टरांना देखील प्रचंड धक्का बसला आहे, जेव्हा या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी सुई टोचल्याच्या खुणा होत्या. ही घटना चीनमधील आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार ही घटना दक्षिण -पश्चिम चीनमध्ये घडली आहे. या मुलाला त्याच्या आईने तब्बल 600 वेळा सुई टोचली, त्यामुळे या दहा महिन्यांच्या मुलाची तब्येत बिघडली, ज्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मुलाची प्रकृती बिघडल्यानं या दहा महिन्यांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जेव्हा डॉक्टरांनी या मुलाला तपासलं तेव्हा त्याची अवस्था पाहून डॉक्टरांना देखील प्रचंड धक्का बसला, या मुलाच्या अंगावर ठीक ठिकाणी जखमा होत्या, याबाबत त्याच्या आईकडे विचारणा केली असता, तिने घडलेला प्रकार सांगितला. मुलगा खूप त्रास द्यायचा, सारखा रडत होता, त्यामुळे त्याला शिक्षा म्हणून आपण सुई टोचत होतो, असं या महिलेनं या डॉक्टरांना सांगितलं.

डॉक्टरांनी कायं सांगितलं?

दरम्यान यासंदर्भात डॉक्टरांनी देखील एक व्हिडीओ जारी केला आहे, त्यामध्ये माहिती देताना त्यांनी सांगितलं की ही घटना युन्नान प्रांतामधील पुआर शहरातील आहे. या बाळाची अवस्था गंभीर होती, या महिलेनं या मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या मुलाची अवस्था पाहून धक्काच बसला, मुलाच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमेच्या खुणा होत्या, मुलाची अवस्था प्रचंड गंभीर होती, जेव्हा या महिलेकडे चौकशी करण्यात आली, तेव्हा तीने याबाबत आपल्याला माहिती दिल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.