AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो कधीच सापडला नसता… 44 वर्षानंतर एका च्युइंगमने… बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यातील नराधम असा सापडला

आरोपी कितीही शातीर असला तरी एक ना एक दिवस तो पकडला जातोच. काही ना काही पुरावा त्याने मागे सोडलेला असतो. 60 वर्षी रॉबर्टच्या बाबतीतही असंच घडलंय. त्याला पोलिसांनी अटक केली. एका च्युइंगममुळे तो पकडला गेलाय. विशेष म्हणजे 44 वर्षापूर्वी घडलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तो दोषीही आढळला आहे. आता फक्त...

तो कधीच सापडला नसता... 44 वर्षानंतर एका च्युइंगमने... बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यातील नराधम असा सापडला
Murder caseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 25, 2024 | 3:11 PM
Share

गुन्हेगारी विश्वात अनेक गुन्ह्यांचा शोध लागत नाही. काहीच पुरावा नसल्याने अनेकदा फाईल बंद करावी लागते. त्यामुळे ज्यांच्यावर अत्याचार झाला, त्यांच्या कुटुंबीयांच्या पदरी निराशा येते. पण शेवटी गुन्हा हा कधी ना कधी उजागर होतोच. अत्यंत किचकट समजल्या जाणाऱ्या गुन्ह्यात एक पुरावाही महत्त्वाचा ठरतो आणि आरोपी गजाआड होतो. अमेरिकेतही अशाच एका गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे 44 वर्षानंतर या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे 44 वर्षानंतर का होईना पीडितेच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमेरिकेत 44 वर्षापूर्वी एका कॉलेजमधील तरुणीचा बलात्कार झाला होता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. ही मर्डर मिस्ट्री अखेर सोडवण्यात आली आहे. 1980मध्ये ही सनसनीखेज घटना घडली होती. या बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण शहरात एकच दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणी अखेर पोलिसांनी एका 60 वर्षाच्या व्यक्तीला अटक केली आहे. विशेष म्हणजे एका च्युइंगममुळे हा आरोपी पकडला गेला आहे.

बलात्कार आणि हत्या

एका च्युइंगममुळे आरोपी पकडला जाऊ शकतो आणि तोही 44 वर्षानंतर हे तुम्ही कधी ऐकलंय का? अमेरिकेच्या स्टेट ओरेगॉनमधील एका व्यक्तीला 1980मध्ये एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात हा आरोपी दोषी आढळला. त्याने खाललेल्या च्युइंगममध्ये सापडलेल्या डीएनएवरून त्याची पोलखोल झाली आहे. आरोपीचं नाव रॉबर्ट असं आहे. तो 60 वर्षाचा आहे. त्याला गेल्या आठवड्यात फर्स्ट डिग्री हत्येच्या प्रकरणात आणि सेकंड डिग्री चार हत्यांच्या प्रकरणात तो दोषी आढळला.

काय घडलं होतं?

मल्टनोमाह काऊंटी डिस्ट्रिक्ट अटॉर्नी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 15 जानेवारी 1980मध्ये घडली होती. बारबरा टकर या 19 वर्षीय कॉलेज विद्यार्थीनीचं कथित अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर रॉबर्टने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कम्पस पार्किंगमध्ये तिला बेदम मारहाण करत तिची हत्या केली. बारबरा माउंट हूड कम्युनिटी कॉलेजची विद्यार्थीनी होती. सकाळी जेव्हा विद्यार्थी कॉलेजात आले तेव्हा त्यांना बारबराचा मृतदेह दिसला. त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती दिली गेली.

दरम्यान, रॉबर्टने आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. रॉबर्टला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आम्ही कोर्टात अपील करणार आहोत, असं रॉबर्टच्या वकिलांनी सांगितलं. आम्ही अपील करू, रॉबर्टची शिक्षा रद्द होईल याची आम्हाला खात्री आहे, असं वकील स्टिफन हाऊज आणइ जॅकब हाऊज यांनी सांगितलं.

च्युइंगममुळे पकडला

2000मध्ये बारबराचा मृतदेह विश्लेषण करण्यासाठी ओरेगन स्टेट पोलीस क्राईम लॅबकडे पाठवण्यात आला. तिच्या व्हजायना स्लॅबचंही परीक्षण करण्यात येणार होतं. क्राईम लॅबमध्ये व्हजायना स्लॅबमधून एका अतिरिक्त डीएनए प्रोफाईलची माहिती मिळाली. चौकशी पथकाला या प्रकरणात रॉबर्टवर संशय होता. पण कोणताच पुरावाजवळ नव्हता.

या तरुणीच्या मृतदेहातून मिळालेला अतिरिक्त डीएनए तब्बल 21 वर्ष जतन करून ठेवण्यात आला. या दरम्यान रॉबर्टवर पाळतही होती. त्याचा डीएनए हवा होता. एकदा रॉबर्ट च्युइंगम खाऊन थुंकला. पोलिसांनी हे च्युइंगम सँपल म्हणून घेतलं आणि क्राईम लॅबला पाठवलं. त्याचं परीक्षण केलं असता तरुणीच्या मृतदेहात मिळालेल्या डीएनएशी रॉबर्टचं डीएनए जुळलं आणि अशा पद्धतीने त्याचा पर्दाफाश झाला.

त्यानंतर 8 जून 2021मध्ये रॉबर्टला अटक करण्यात आली. त्याला मल्टनोमाह काऊंटी डिटेंशन सेंटरमध्ये ठेवलं गेलं. सध्या रॉबर्ट पोलिसांच्या अटकेत आहे. गुन्ह्यात तो दोषी आढळला असून त्याला शिक्षा व्हायची आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता जूनमध्ये होणार आहे.

Follow Us
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत