
मुस्लिम देशांना एकत्र आणून भारताच्या विरोधात मोठा कट रचला जातोय. भारताची मागील काही वर्षांपासूनची होणारी प्रगती शेजारी मुस्लिम देशांना देखवत नसून भारताला अडचणीत आणण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केली जात आहेत. त्यामध्येच पाकिस्तान काही मुस्लिम देशांना हाताशी धरून भारताविरोधात मोठा कट रचत आहे. 9 सप्टेंबर रोजी कतारमध्ये इस्रायलविरुद्ध आपत्कालीन शिखर परिषदेत सुमारे 60 मुस्लिम देशांनी एकत्र आले. पाकिस्तान आणि इजिप्तने इस्लामिक नाटो किंवा युनायटेड इस्लामिक मिलिटरी फोर्सची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जोरदार समर्थन केले. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने मुस्लिम देशांचे पाय चाटली. भारताविरोधात मुस्लिम देशांना एकत्र आणण्याचे काम पाकिस्तानकडून केले जातंय.
तुर्कीचे संरक्षण मंत्री यासर गुलेर यांनी जुलैमध्ये प्रादेशिक सुरक्षेवर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानला भेट दिली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्कीने पाकिस्तानची साथ दिली. जुलैमध्ये दोन्ही देशांनी सुमारे $900 दशलक्ष किमतीचे संरक्षण करार केले. तुर्कीने पाकला बायरक्तार टीबी2 आणि अकिंसी ड्रोन पुरवेल. सातत्याने तुर्कीकडून पाकिस्तानला मोठी मदत दिली जातंय. फक्त तुर्कीच नाही तर अनेक मुस्लिम देश विविध प्रकारे पाकिस्तानला मदत करत आहेत.
तुर्की, अझरबैजान आणि जॉर्डन हे पाकिस्तानचे विश्वासू भागीदार आहेत आणि त्यामुळे ते भारताचे शत्रुत्व दाखवू शकतात. पाकिस्तान एकटा नाही, असे स्पष्ट मुस्लिम देशांकडून भारताला दाखवले जातंय. तुर्की नाटोचा भाग आहे तर जॉर्डन देखील अमेरिकेवर अवलंबून आहे. अझरबैजान तुर्कीवर अवलंबून आहे. भारताने भविष्यात पाकिस्तानवर मोठा हल्ला केला तर हे सर्व देश पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवू शकतात.
संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल जीडी बक्षी म्हणाले की, पाकिस्तान आपल्याला त्रास देण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. भारताने बचावात्मक भूमिका घेऊ नये. इतरही मुस्लिम देशांना पाकिस्तान भारताविरोधात भडकून देत आहे. हेच नाही तर भारताविरोधात मुस्लिम देश मिळून चाल करू शकतात, असेही सांगितले जातंय. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने मोठा हल्ला करत पाकिस्तानला दाखवून दिली भारताची ताकद, त्यानंतर पाकिस्तान मुस्लिम देशांना हाताशी धरताना दिसतोय.