भारतावर 100 टक्के टॅरिफ?, अमेरिका कठोर निर्बंध लादण्याचा तयारीत, थेट रशिया…
टॅरिफच्या मुद्द्याहून भारत अमेरिकेतील संबंध तणावात असतानाच आता भारतासह चीनवर मोठे निर्बंध लादण्याच्या तयारीत अमेरिके असल्याचे कळतंय. याबाबतचे अत्यंत मोठे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर सातत्याने निर्बंध लादताना दिसत आहेत. अमेरिकेने लावलेल्या 50 टक्के टॅरिफनंतरही दोन्ही देशांमधील संबंध व्यवस्थित आहेत. सध्या भारत अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू आहे. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने लावला. अमेरिकेच्या दबावानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी जवळपास बंद केली. मात्र, अमेरिकेने भारतावरील टॅरिफ अजूनही रद्द केला नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फक्त आणि फक्त भारतावरील टॅरिफ कमी करण्याचे संकेत मागील काही दिवसांपासून दिली जात आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्यानंतरही आता मोठा इशारा देत थेट अधिस निर्बंध वाढवण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी हैराण करणारे भाष्य केले. भारतावर अजून काही निर्बंध अमेरिकेकडून लादली जाऊ शकतात.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, रशियासोबत व्यापार करणारे देश युक्रेन युद्धाला जबाबदार आहेत. रशियाकडून ऊर्जेची आयात करणारे देश युद्धाला पाठबळ देत आहेत. आता यापुढे रशियासोबत जो देश व्यापार करेल, त्याच्यावर खूप जास्त कठोर निर्बंध लादली जातील. हैराण करणारे म्हणजे या यादीत भारतासह चीन असल्याचेही सांगितले जातंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर टीका केली.
यापूर्वी भारतावर गंभीर आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांनी बऱ्याचदा म्हटले की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने युक्रेन युद्ध सुरू आहे. रशियाकडून तेल खरेदी करून भारत जगभरात नफेखोरी करतो. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावूनही अमेरिकेचे पोट भरले नसल्याचे स्पष्टपणे बघायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, चीनवर 100 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. 1 नोव्हेंबर 2025 पासून टॅरिफची अंमलबजावणी केली जाईल.
त्यानंतर चीनने अमेरिकेसोबत काही महत्वाचे करार केले आणि त्यांच्यावरील टॅरिफचे मोठे संकट टळले. आता पुन्हा एकदा रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर कारवाई करण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प असल्याचे स्पष्टपणे बघायला मिळतंय. भारतावर 100 टक्क्यांपेक्षा अधिक टॅरिफ लावला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा वाईट परिणाम भारताच्या बाजारपेठेतील काही क्षेत्रांवर झाला.
