AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लीम देशाकडून इराणवर भयानक हल्ले, गुप्तपणे धाडधाड…गुपित समोर येताच जगात खळबळ!

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अजूनही थांबलेले नाही. सध्या हे युद्ध फक्त आत्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आलेले आहे. लवकरच पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता जगाला हादरवून टाकणारी एक माहिती समोर आली आहे.

मुस्लीम देशाकडून इराणवर भयानक हल्ले, गुप्तपणे धाडधाड...गुपित समोर येताच जगात खळबळ!
iran attack and mojtaba khameneiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 13, 2026 | 4:54 PM
Share

सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा मुद्दा खूपच गंभीर झाला आहे. दोन्ही देशांतील युद्ध अजूनही संपलेले नाही. त्यामुळेच भारत तसेच जगभरातील इतर देशांवर उर्जासंकट आले आहे. हे युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यातील हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने अनेक आखाती देशांवर हल्ले केले होते. ज्या देशांत अमेरिकन लष्कराचे तळ आहेत, त्या देशांना इराणने प्रामुख्याने लक्ष्य केले होते. आता त्याच काळात यातील एका मुस्लीम राष्ट्राने इराणवर गुपचूप हल्ले केल्याचे समोर आले आहे. या गुप्त हल्ल्यांबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दोन इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार इराण जेव्हा आखाती देशांवर हल्ले करत होता. तेव्हा सौदी अरेबिया या देशानेही इराणला जशास तसे प्रत्युत्तर दिले होते. हे हल्ले एकदम गुपचूप पद्धतीने करण्यात आले होते. विशेष म्हणजे या हल्ल्यांविषयी सौदी इरेबियाने कुठेही वाच्यता केली नव्हती. आता मात्र या हल्ल्यांबाबतची माहिती समोर आली आहे. सौदी अरेबियाने पहिल्यांदाच इराणवर अशा पद्धतीने जमिनीवरून हल्ले केलेले आहेत.

सौदी अरेबियाने प्रत्युत्तर म्हणून केले होते हल्ले

इराणी अधिकाऱ्यंनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात सौदी अरेबियाने हे हल्ले केले होते. याच काळात इराणकडून आखाती देशांवर हल्ले केले जात होते. अमेरिका देश इराणवर हल्ले करत होता. त्याच हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर इराणकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागले जात होते. अगोदर सौदी अरेबियावर हल्ले झाले होते. त्यानंतर मग या देशाने प्रत्युत्तरादाखल हे प्रतिहल्ले केले होते.

हल्ले नेमके कुठे झाले कोणालाही माहिती नाही

दरम्यान या हल्ल्यांत इराणचे नेमके किती नुकसान झाले? हे अद्याप समोर आलेले नाही. सोबतच इराणच्या नेमक्या कोणत्या ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले, याबाबतही नेमकी माहिती समोर आलेली नाही. सौदी अरेबियातील परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनीदेखील या हल्ल्यांची पुष्टी केलेली नाही.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक