AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Muslim Nato : पाकिस्तान, सौदीच्या आघाडीत आता तिसरा शक्तीशाली देश… युद्धभूमीवर भारताच्या मिलिट्रीसमोर सर्वात मोठं चॅलेंज

Muslim Nato : पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये Strategic Mutual Defence Agreement नावाचा करार झाला आहे. आता या आघाडीमध्ये एक तिसरा शक्तीशाली देश सहभागी होणार आहे. असं होणं हे भारतासाठी सर्वात जास्त धोक्याचं असेल. तो देश कुठला? आणि काय आव्हान असतील? समजून घ्या.

Muslim Nato : पाकिस्तान, सौदीच्या आघाडीत आता तिसरा शक्तीशाली देश... युद्धभूमीवर भारताच्या मिलिट्रीसमोर सर्वात मोठं चॅलेंज
Pakistan-Saudi Pact
| Updated on: Jan 21, 2026 | 1:07 PM
Share

जगात एका नवीन NATO चा जन्म होताना दिसतोय. याची चर्चा अनेक वर्षांपासून आहे. एक अशी सैन्य आघाडी जी मुस्लिम देशांच्या तीन मोठ्या सैन्य शक्तींना एका झेंड्याखाली एकत्र आणणार. तुर्कीचं आधुनिक सैन्य, पाकिस्तानचा अणू बॉम्ब आणि सौदी अरेबियाचा प्रचंड पैसा हे तिघे एकत्र येऊ शकतात. असं झाल्यास जगात शक्ती संतुलन बदलू शकतं. जगाचा नकाशा सुद्धा बदलू शकतो. अनेक रिपोर्ट्सनुसार, ही कुठली कल्पना नाही तर आता हे वास्तव प्रत्यक्षात येण्याच्या खूप जवळ आहे. रिपोर्ट्सनुसार, तुर्की आता सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या Strategic Mutual Defence Agreement मध्ये सहभागी होण्याच्या फायनल स्टेजमध्ये आहे. याचा अर्थ असा होतो की, एका देशावर हल्ला हा तिघांवर हल्ला मानला जाईल. NATO च्या आर्टिकल 5 सारखा क्लॉज लागू झाला, तर मिडिल ईस्ट आणि दक्षिण आशियाचं जिओ-पॉलिटिक्स कायमसाठी बदलून जाईल. तुर्कीचा प्लान काय? आणि भारतावर याचा काय परिणाम होईल हे जाणून घ्या.

ब्लूमबर्गच्या ताज्या रिपोर्टने जगभरातल्या सर्व संरक्षण एक्सपर्ट्सना हैराण करुन सोडलय. रिपोर्टनुसार, तुर्की एका म्यूचुअल डिफेंस फ्रेमवर्कमध्ये सहभागी होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. मूळ करार सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये झाला आहे. सप्टेंबर 2025 मध्ये सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये रियाद येथे एक ऐतिहासिक करार झाला. Strategic Mutual Defence Agreement (SMDA) यावर सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी स्वाक्षरी केली. आता तुर्की या संघटनेचा तिसरा सदस्य बनण्याच्या तयारीत आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, हा करार लवकर प्रत्यक्षात येऊ शकतो. असं झाल्या हा फक्त कागदी करार नसेल, तर त्रिपक्षीय सैन्य ब्लॉग निर्माण होईल. अनौपचारिकरित्या त्याला Muslim NATO म्हटलं जातय.

भारताला मुख्य धोका काय?

भारतासाठी या स्ट्रॅटेजिक-म्युचुअल संरक्षण कराराचा (SMDA) अर्थ काय?. पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबिया या तीन देशांनी म्यूचुअल डिफेंस पॅक्ट लागू केला, तर भारताच्या सुरक्षेला थेट आव्हान असेल. कारण भारत-पाकिस्तानमध्ये काही संघर्ष झाल्यास तुर्की आणि सौदी अरेबिया या करारातंर्गत पाकिस्तानला मदत करण्यासाठी बाध्य असतील का? हा प्रश्न आहे.

या कारारचा जो ड्राफ्ट बनवलाय त्याचे डिटेल्स अजून समोर आलेले नाहीत. तुर्की त्या सर्व अटींवर स्वाक्षरी करणार का? या बद्दल अजून स्पष्टता नाहीय. कलेक्टिव डिफेन्सचा क्लॉज आपल्यातच चिंताजनक आहे. पाकिस्तानकडून नेहमीच काश्मीर मुद्यावर तुर्की आणि सौदी अरेबियाला आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न होतो. आतापर्यंत हे फक्त वक्तव्यांपर्यंत मर्यादीत होतं. पण असा सैन्य करार झाल्यास पाकिस्तानच बळ नक्कीच वाढेल.

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.